कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसार होवू नये यासाठी मौजे कर्नाळ कंटेनमेंट झोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 10:15 AM2020-05-05T10:15:02+5:302020-05-05T10:17:01+5:30
तातडीची प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सदरचा भाग प्रतिबंधित करण्याच्या अनुषंगाने भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मिरज
सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील मौजे कर्नाळ या ग्रामपंचायत हद्दीत कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेले आहेत. या भागात कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसार होवू नये यासाठी सदर भागातील व्यक्ती जनतेच्या हालचालींवर व प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर जाणे व बाहेरून प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. तातडीची प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सदरचा भाग प्रतिबंधित करण्याच्या अनुषंगाने भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मिरज तालुक्यातील मौजे-कर्नाळ येथे कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेल्या ठिकाण कंटेनमेंट झोन व बफर झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - (1) कर्नाळ पाण्याची टाकी ते मौजे डिग्रज शिवकडे जाणारा रस्त्यांची दोन्ही बाजू, (2) नांद्रे व मौजे डिग्रज रस्ता चौक पर्यंतचा भाग, (3) दक्षिण बाजूस पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारा ओढा, बफर झोन पुढीलप्रमाणे - (1) कर्नाळ ते सांगली रस्ता-रजपूत मंगल कार्यालयाजवळ 2 कि.मी, (2) कर्नाळ ते बुधगाव रस्ता- अंकुश हरिबा जाधव घराजवळ 1 कि.मी, (3) कर्नाळ ते बिसूर रस्ता-रमेश पांडुरंग रणदिवे घराजवळ 500 मीटर, (4) कर्नाळ ते नांद्रे रस्ता-कर्नाळ ओढा पुलावरती 1 कि.मी, (5) कर्नाळ ते मौजे डिग्रज- मौजे डिग्रज शिवजवळ 2 कि.मी, या भागांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशी अधिसूचना जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केली आहे.