सिलिंडर २२५ रुपयांनी महागला अन् दहा रुपयांनी स्वस्त झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:26 AM2021-04-02T04:26:20+5:302021-04-02T04:26:20+5:30

सांगली : पाच महिन्यांतच तब्बल २२५ रुपयांनी महागलेल्या गॅस सिलिंडरला बुधवारी दहा रुपयांची स्वस्ताई लाभली. तरीही गेल्या पाच महिन्यांपासून ...

The price of a cylinder has gone up by Rs 225 to Rs 10 | सिलिंडर २२५ रुपयांनी महागला अन् दहा रुपयांनी स्वस्त झाला

सिलिंडर २२५ रुपयांनी महागला अन् दहा रुपयांनी स्वस्त झाला

Next

सांगली : पाच महिन्यांतच तब्बल २२५ रुपयांनी महागलेल्या गॅस सिलिंडरला बुधवारी दहा रुपयांची स्वस्ताई लाभली. तरीही गेल्या पाच महिन्यांपासून सिलिंडरच्या महागाईने होरपळलेल्या ग्राहकांना दरात झालेली घट फारशी समाधान देणारी ठरली नाही.

सांगली जिल्ह्यातील गॅस ग्राहकांना मार्च महिन्यात ८२२ रुपये ५० पैशाने सिलिंडर विकत घ्यावा लागला. १ एप्रिलला दहा रुपयांनी सिलिंडरच्या दरात घट झाली. त्यामुळे ग्राहकांना अल्प दिलासा मिळाला असला तरी सिलिंडरच्या महागाईने व अनुदान बंद झाल्याने त्यांच्यातील निराशा कमी झाली नाही. स्वयंपाकघरातील गृहिणींचे कोलमडलेले बजेट यामुळे पुन्हा सुधारणा नाही. सिलिंडर दरात मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.

चौकट

असे वाढले दर

नोव्हेंबर २०२० ५९७.५०

डिसेंबर २०२० ६८७.५०

जानेवारी २०२१ ६९७.५०

फेब्रुवारी २०२१ ७२२.५०

मार्च २१ ८२२.५०

एप्रिल ८१२.५०

कोट

गेल्या सहा महिन्यांपासून महागड्या दराने सिलिंडर घेत आहोत. घरखर्चाचा भार सिलिंडरमुळे अधिक वाढला आहे. त्यामुळे केवळ दहा रुपयांनी स्वस्त सिलिंडरने फारसा काही फरक पडणार नाही. सिलिंडरचे दर ५००च्या घरात असणेच परवडणारे आहे.

- मुक्ता जाधव, गृहिणी, सांगली

कोट

सिलिंडरच्या दरवाढीने हातावरचे पोट असणाऱ्या गरीब कुटुंबांचे हाल सुरू आहेत. सिलिंडर वापरणे आता त्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. एकीकडे मोठी दरवाढ करायची आणि किरकोळ कपात करून मोठा निर्णय घेतल्याचा आव आणायचा, ही पद्धत चुकीची आहे.

- रेहाना शेख, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना

कोट

महिन्याच्या कमाईतील माेठा भाग सिलिंडरवरच खर्च होत आहे. अनुदानही आता बंद झाले आहेत. त्यामुळे मिळेल त्या दराने सिलिंडर घ्यावा लागत आहे. शासनाकडून सामान्य लोकांच्या आर्थिक अडचणींचा कधीच विचार केला जात नाही.

- सुवर्णा जिमगे, गृहिणी, सांगली

Web Title: The price of a cylinder has gone up by Rs 225 to Rs 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.