हळदीला ७१२५ रुपये दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:51 AM2020-12-17T04:51:40+5:302020-12-17T04:51:40+5:30
सोयाबीनला ४२५० रुपये दर सांगली : येथील मार्केट यार्डात बुधवारी निघालेल्या सोयाबीनच्या सौद्यामध्ये प्रतिक्विंटल चार हजार ते चार हजार ...
सोयाबीनला ४२५० रुपये दर
सांगली : येथील मार्केट यार्डात बुधवारी निघालेल्या सोयाबीनच्या सौद्यामध्ये प्रतिक्विंटल चार हजार ते चार हजार २५० रुपये दर मिळाला आहे. सरासरी चार हजार १२५ रुपये दर मिळाला आहे. सात हजार २२५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. सोयाबीनमधील ओलावा कमी होत असल्यामुळे दरात वाढ झाली आहे.
गुळाला ४०८० रुपये दर
सांगली : कोल्हापुरी गुळाला प्रतिक्विंटल दोन हजार ९०० ते चार हजार ८० रुपये दर मिळाला आहे. सरासरी तीन हजार ४९० रुपये दर मिळाल्यामुळे शेतकरी आणि गूळ उत्पादक चिंतेत सापडला आहे. गुळाचे दर कधी वाढणार? असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. बुधवारी एक हजार २२६ क्विंटल, तर एप्रिल ते १६ डिसेंबरपर्यंत तीन हजार ७४ हजार २६ क्विंटल गुळाची आवक झाली होती.