खतांच्या किमती गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 11:38 PM2018-12-04T23:38:48+5:302018-12-04T23:39:05+5:30

अशोक डोंबाळे । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : इंधनाचे दर दिवसागणिक नवे उच्चांक प्रस्थापित करत असताना, पाठोपाठ खतांच्या किमतीही ...

The prices of fertilizers | खतांच्या किमती गगनाला

खतांच्या किमती गगनाला

Next

अशोक डोंबाळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : इंधनाचे दर दिवसागणिक नवे उच्चांक प्रस्थापित करत असताना, पाठोपाठ खतांच्या किमतीही गगनाला भिडल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतीसाठी महत्त्वाच्या असलेल्या खतांच्या किमती जवळपास १५० ते २०० रुपयांनी वाढल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. दुष्काळामुळे वाढणारे कर्ज, मातीमोल भावाने विकला जाणारा शेतीमाल, त्यातच खतांची दरवाढ झाल्यामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक शोषण सुरु आहे.
खतांसाठी आवश्यक असणाºया मॅग्नेशियमचा पुरवठा तामिळनाडूतून होतो. तामिळनाडूतल्या खाणीतून मॅग्नेशियम मिळेनासे झाले आहे. त्यामुळे नत्र आणि सुपरफास्ट रसायने आयात करावी लागत आहेत. भारतासोबत अन्य देशांकडूनही या रसायनांना अचानक मागणी वाढली आहे. त्यातच खत निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या फॉस्फेटच्याही किमतीत वाढ झाली आहे. डीएपी खतासाठी पेट्रोलियम पदार्थांचा वापर होत असल्यामुळेही खताच्या किमती वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत. तसेच इंधन दरवाढीमुळे वाहतूकदारांनी वाहतूक खर्चात वाढ केली आहे. त्यामुळे खत कंपन्यांना खताच्या किमतीत वाढ करणे गरजेचे वाटू लागले आहे. इंधनाच्या किमतीसोबत ही वाढ होत होती, परंतु ती फारशी लक्षात येण्याएवढी नव्हती. इंधनाच्या किमती वाढल्यानंतर खतांच्याही किमती वाढल्या आहेत. पण, सध्या इंधनाचे दर प्रति लिटरला दहा ते बारा रुपयांनी उतरले आहेत. यावेळी व्यापारी आणि कंपन्यांनीही खताचे दर कमी करुन शेतकºयांना दिलासा देण्याची गरज आहे.
लूट सर्वांकडूनच : विकास देशमुख
इंधन दरवाढीनंतर लगेच खतांच्या किमतीत मोठी वाढ करून शेतकºयांची लूट सुरू आहे. इंधन दर वाढले म्हणून शेतकºयांचा भाजीपाला व धान्याच्या किमती वाढल्या नाहीत, पण रासायनिक खतांच्या किमती मात्र लगेच वाढविल्या जात आहेत. सध्या पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी झाल्यामुळे व्यापारी आणि खते निर्माण करणाºया कंपन्यांनी खताचे दर कमी केले पाहिजेत. परंतु, शेतकºयांना लुटायला बसलेले कधीच मनाने खताचे दर कमी करणार नाहीत. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष विकास देशमुख व उपाध्यक्ष महावीर पाटील यांनी दिला आहे.
खतांचे वाढलेले दर (रुपये)

खत जुने दर नवीन दर
डीएपी १२१५ १४००
२४.२४.० १११० १२७५
२४.२४.०.८ ११०० १२०५
१२.३२.१६ ११५५ १३१०
१४.३५.१४ १२४० १२७५
एमओपी ६७० ९३०

Web Title: The prices of fertilizers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली