शून्य कचरा मोहिमेसाठी आयुष सेवाभावी संस्थेचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:20 AM2021-01-10T04:20:20+5:302021-01-10T04:20:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : शून्य कचरा मोहीम घरोघरी पोहोचविण्यासाठी कार्यशाळा, बैठकांमधून जनजागृती करणाऱ्या आयुष संस्थेचा नगरविकास मंत्री एकनाथ ...

Pride of AYUSH Sevabhavi Sanstha for zero waste campaign | शून्य कचरा मोहिमेसाठी आयुष सेवाभावी संस्थेचा गौरव

शून्य कचरा मोहिमेसाठी आयुष सेवाभावी संस्थेचा गौरव

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : शून्य कचरा मोहीम घरोघरी पोहोचविण्यासाठी कार्यशाळा, बैठकांमधून जनजागृती करणाऱ्या आयुष संस्थेचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सत्कार झाला. संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटील व अजित कांबळे यांनी सत्कार स्वीकारला.

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, मुख्य सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, आयुक्त नितीन कापडणीस, खासदार संजय पाटील, महापैार गीता सुतार आदी उपस्थित होते.

संस्थेने महापालिकेच्या सोबतीने सोसायट्या, कॉलनीमध्ये सामूहिक कंपोस्ट खत निर्मिती, कचऱ्याचे वर्गीकरण करणे यासाठी प्रशिक्षण दिले. याचा अवलंब करणाऱ्या सुवर्णा राऊत यांच्या घराला महापालिकेच्या पंचतारांकित घराचा मान मिळाला. अमोल पाटील यांनी फक्त बागकाम करणाऱ्यांपुरती संकल्पना मर्यादित न ठेवता स्वच्छ शहरासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकापर्यंत पोहोचविली. त्याची दखल सत्काराद्वारे घेण्यात आली.

Web Title: Pride of AYUSH Sevabhavi Sanstha for zero waste campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.