पलूस-कडेगावची शान आणि कार्यकर्त्यांचा अभिमान : डॉ. पतंगराव कदम साहेब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:26 AM2021-01-08T05:26:01+5:302021-01-08T05:26:01+5:30

साहेब तब्बल १ लाखाहून माताधिक्याने विजयी झाले होते. या काळात त्यांनी पलूस-कडेगाव मतदारसंघाचा कायापालट केला आणि या मतदारसंघातील जनतेशी ...

Pride of Palus-Kadegaon and pride of activists: Dr. Patangrao Kadam Saheb | पलूस-कडेगावची शान आणि कार्यकर्त्यांचा अभिमान : डॉ. पतंगराव कदम साहेब

पलूस-कडेगावची शान आणि कार्यकर्त्यांचा अभिमान : डॉ. पतंगराव कदम साहेब

Next

साहेब तब्बल १ लाखाहून माताधिक्याने विजयी झाले होते. या काळात त्यांनी पलूस-कडेगाव मतदारसंघाचा कायापालट केला आणि या मतदारसंघातील जनतेशी जिव्हाळ्याचे नाते जपले. पलूस-कडेगाव मतदारसंघातील कार्यकर्ते आणि जनता हीच डॉ. पतंगराव कदम साहेबांची ऊर्जा होती. डॉ. पतंगराव कदम साहेब हीच पलूस-कडेगावची शान आणि

कार्यकर्त्यांचा अभिमान’ होते. आज डॉ. पतंगराव कदम साहेब यांची जयंती त्यानिमित्ताने...

१९६४ मध्ये वयाच्या १९ व्यावर्षी भारती विद्यापीठाची स्थापना करून अविरतपणे शिक्षण आणि सामाजिक कार्यासाठी तसेच पलूस-कडेगाव मतदारसंघाच्या विकासासाठी स्वतःला वाहून घेतलेल्या पतंगराव कदम यांनी राज्याच्या राजकारणात आणि मंत्रिमंडळातही प्रभावी कामगिरी करून आदरणीय स्थान प्राप्त केले होते.

आपल्या पलूस-कडेगाव मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न

सोडविण्यासाठी आणि विधायक कामांसाठी विधानसभेत आवाज

उठवून हवा तेवढा निधी खेचून आणण्याची

शक्ती त्यांच्या कार्यशैलीतच होती. राज्याच्या मंत्रिमंडळात तब्बल २० वर्षे मंत्री म्हणून काम करीत असताना त्यांनी सामान्य जनतेच्या हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर अशा आपत्कालीन परिस्थितीत त्यांनी घेतलेले धडाकेबाज निर्णय आजही राज्य सरकारला मार्गदर्शक ठरत आहेत.

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास

मनात घेऊन या मतदारसंघाच्या विकासासाठी तब्बल ३५ वर्षे अविरतपणे

परिश्रम घेऊन त्यांनी या मतदारसंघाचा कायापालट केला. १९६४ मध्ये त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली. १९६८ मध्ये डॉ. पतंगराव कदम साहेब एसटी बोर्डाचे सदस्य झाले. त्यावेळी ‘गाव तिथे एसटी’ ही योजना त्यांनी प्रभावीपणे राबविली. मतदार संघातील आणि दुष्काळी भागातील हजारो तरुणांना एसटी महामंडळात नोकऱ्या दिल्या. यामुळे डॉ. पतंगराव कदम या नावाची चर्चा तर खूप होऊ लागलीच. पण त्यांच्याकडून अपेक्षाही वाढल्या.

१९८० च्या विधानसभा निवडणुकीत भिलवडी-वांगी मतदारसंघातून त्यांनी पहिली निवडणूक लढविली. मात्र

पोस्टाच्या मतात त्यांचा पराभव झाला. १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत

त्यांना काँग्रेसचं तिकीट जाहीरही झाले होते; परंतु आयत्यावेळी ते कापण्यात आले. त्यामुळे अपक्ष म्हणून ते निवडणूक मैदानात उतरले आणि विजयी झाले. आमदार होताच त्यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. या काळात भिलवडी-वांगी मतदारसंघाच्या विकासाची दालने खऱ्याअर्थाने खुली झाली. मतदारसंघातील विधायक कामे नेटाने करणारी एक झंझावाती शक्ती आणि तरुण तडफदार आमदार म्हणून पतंगराव कदम यांचे नाव चर्चेत येऊ लागले. आताच्या कडेगाव तालुक्यातील सर्व गावे त्यावेळी खानापूर तालुक्यात होती. या भागाकडे कायम दुष्काळी भाग म्हणून पाहिले जायचे. शासनाची स्थिती

सुधारण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी त्याकाळी शून्याधारित अंदाजपत्रक (झिरो बजेट) लागू केले होते. याचा फटका ताकारी योजनेला बसणार होता. प्रारंभालाच या योजनेसाठीच्या निधीचा मार्ग झिरो बजेटमुळे बंद झाला होता. यावर मार्ग काढायचा निर्धार करून डॉ. पतंगराव कदम साहेब यांनी शंकरराव चव्हाण यांच्या उपस्थितीत कडेगाव येथे १३ जानेवारी १९८७ रोजी

दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचा

मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात डॉ पतंगराव कदम साहेब

यांनी येथील दुष्काळी भागाची व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडली आणि ताकारी योजना हाच दुष्काळावर मात करण्याचा एकमेव उपाय असल्याचे सांगितले. यामुळे शंकरराव चव्हाण यांनी या योजनेसाठी निधी देण्याचे मान्य केले आणि कामाला सुरुवात झाली.

यानंतर १९९० च्या विधानसभा

निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर डॉ. पतंगराव कदम आमदार झाले. त्यानंतर वर्षभरातच राज्याचे

शिक्षण मंत्री झाले आणि पाटबंधारे खात्याचा अतिरिक्त कारभार आला. यामुळे ताकारी योजनेला अधिक गती मिळाली.

दरम्यान, १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतरच्या

पोटनिवडणुकीत डॉ. पतंगराव कदम

यांचा पराभव झाला. युती शासन सत्तेवर आले. २ जुलै १९९९ रोजी पलूस तालुक्याची निर्मिती झाली आणि त्यानंतर

लगेच ऑक्टोबर १९९९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा पतंगराव कदम साहेब विजयी झाले. त्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात उद्योग व जलसंधारण मंत्री म्हणून कार्यरत असलेल्या पतंगराव कदम

साहेबांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून ६ एप्रिल २००२ मध्ये कडेगाव तालुक्याची निर्मिती केली. येथून पुढे पलूस-कडेगाव मतदारसंघाच्या विकासाला खऱ्याअर्थाने अधिक गती मिळाली. हा कालावधीपलूस कडेगावसाठी सुवर्णकाळ ठरला. पलूस आणि कडेगाव दोन्ही तालुक्यात

प्रशासकीय कार्यालयांच्या इमारती

साकारल्या. सोनहिरा कारखाना सुरू

झाला, सागरेश्वर आणि कृष्णा-वेरळा सूतगिरणी उभा राहिली. गावोगावी सर्वांगीण विकासाची कामे वेगात सुरू झाली आणि मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलू लागला. ताकारी योजनेचे पाणी घाटमाथ्यावर आले आणि हरितक्रांती झाली. यानंतर २००४ च्या निवडणुकीत डॉ. पतंगराव कदम १ लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी झाले. त्यांना महसूल, सहकार, मदत व पुनर्वसन आदी महत्त्वपूर्ण खात्याचे मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत असताना डॉ. पतंगराव कदम त्यांनी ताकारी व टेंभू योजनेच्या कामांकडे अधिक लक्ष दिले आणि या योजनांची कामे मार्गी लावली.

विकास कामात अग्रेसर राहिल्यामुळे पलूस-कडेगाव मतदारसंघात त्यांची मजबूत पकड बसली. राज्याच्या राजकारणातही त्यांचा दबदबा निर्माण झाला.

यानंतर २००९ च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. पतंगराव कदम यांनी सलग तिसरा विजय मिळवून हॅट‌्ट्रिक साधली. यावेळी त्यांना वन, मदत व पुनर्वसन खाते मिळाले. या काळात डॉ. पतंगराव कदम यांनी

अतुलनीय असे काम केले. यात

कुंडल येथील वानिकी

प्रशिक्षण केंद्र, यशवंतराव चव्हाण

यांच्या जन्मशताब्दी

वर्षात देवराष्ट्रे व सागरेश्वर वन्य जीव

अभयारण्यात केलेली विकासकामे

विशेष उल्लेखनीय आहेत. चौरंगीनाथ पर्यटन स्थळाचा विकास झाला.

जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी प्रभावशाली

कामगिरी केली. सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची आकर्षक व भव्य इमारत त्यांच्या कारकीर्दीत साकारली आहे. राज्य शासनात त्यांच्या शब्दाला धार होती. यामुळे दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर या काळात धडाडीने निर्णय घेतले.

पलूस-कडेगाव मतदारसंघातील जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या, त्यांना हवी ती मदत करणाऱ्या डॉ. पतंगराव कदम साहेबांनी भारती विद्यापीठ आणि संलग्न संस्थांच्या माध्यमातून येथील हजारो तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांनी कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या मनात अक्षरशः घर केले होते. इथल्या कित्येक मुलांना भारती विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी प्रवेश दिला. शैक्षणिक फी माफी आणि सवलती

दिल्या. कित्येक आजारी रुग्णांवर

भारती हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार केले. शेतकऱ्यांच्या बांधावर सिंचन

योजनांचे पाणी आणण्यासाठी

परिश्रम घेतले. गावोगावी मुख्य व अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा योजना, गटारी, ग्राम सचिवालय, चौक सुशोभिकरण, मंदिरांची उभारणी, सामाजिक सभागृहे अशी सर्वांगीण विकासाची कामे केली.

यामुळेच येथील जनतेचे आणि साहेबांचे नाते जिव्हाळ्याच होते. पलूस-कडेगावमधील जनतेच्या मनात डॉ. पतंगराव कदम साहेबांचे स्थान सदैव अढळ राहणार आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत

राज्यात सर्वत्र काँग्रेसची पडझड झाली,

तरीही डॉ. पतंगराव कदम यांनी

आपला पलूस-कडेगावचा गड अबाधित ठेवून विजयी चौकार मारला. यावेळी राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता आली. मात्र तरीही डॉ. पतंगराव कदम हे आमदार म्हणून विधायक कामांसाठी अविश्रांत परिश्रम घेेेतच होते. मतदारसंघात लाल दिव्याच्या गाडीतून झंझावाती दौरे काढून, सभा घेऊन, जनता दरबार घेऊन माणसे जोडतच होते. राज्यात काँग्रेसला नवी संजीवनी देण्याचा त्यांचा ध्यास

सुरूच होता. पलूस-कडेगावचा कायापालट त्यांनी केला असताना आणि मतदारसंघ विकासाचे आदर्श मॉडेल म्हणून नावारूपास येत असताना या मतदारसंघाने

ज्यांच्याकडे ‘दैवत’ अर्थात माणसातला देव म्हणून पाहिले, ते डॉ. पतंगराव कदमसाहेब सर्वांना सोडून गेले; मात्र त्यांच्या पवित्र

स्मृती सदैव जिवंत राहतील.

- लेखक : प्रताप महाडिक

कडेगाव

Web Title: Pride of Palus-Kadegaon and pride of activists: Dr. Patangrao Kadam Saheb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.