सांगलीत शिक्षक बँकेच्या सभेत फ्री स्टाईल हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 12:59 PM2018-09-09T12:59:56+5:302018-09-09T14:19:52+5:30

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत रविवारी सत्ताधारी व विरोधकांत फ्री स्टाईल हाणामारी झाली.

primary teachers bank meeting in Sangli District | सांगलीत शिक्षक बँकेच्या सभेत फ्री स्टाईल हाणामारी

सांगलीत शिक्षक बँकेच्या सभेत फ्री स्टाईल हाणामारी

googlenewsNext

सांगली : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षकबँकेच्या सर्वसाधारण सभेत रविवारी सत्ताधारी व विरोधकांत फ्री स्टाईल हाणामारी झाली. सत्ताधारी गटाचे संचालक शशिकांत बजबळे यांना व्यासपीठावर खाली पाडून मारहाण करण्यात आली. तर मारहाण करणाऱ्या गुरुजीला सत्ताधाऱ्यांनी प्रसाद दिला. या अभूतपूर्व गोंधळातच सत्ताधाऱ्यांनी सर्व विषय मंजूर करीत पाच मिनिटातच सभा गुंडाळली.

प्राथमिक शिक्षकबँकेची 66 वी सर्वसाधारण सभा दीनानाथ नाट्यगृहात पार पडली. सुरुवातीपासूनच सभेत तणावाची स्थिती होती. सत्ताधारी शिक्षक समितीने सभागृहात पहिल्या रांगेतील खुर्च्यावर कब्जा केला होता. त्यात व्यासपीठासमोरील मोकळ्या जागेत जाण्यासाठीचा मार्गही खुर्च्या टाकून अडविला होता. यावरून सभेच्या सुरुवातीलाच विरोधी शिक्षक संघ थोरात गटाच्या समर्थकांनी दंगा करण्यास सुरुवात केली.

बँकेचे व्यवस्थापक बाळासाहेब कोले यांनी अहवाल वाचनाला सुरुवात केली. विरोधी संचालक विनायक शिंदे यांनी व्यासपीठसमोर येत अजेंड्यावरील जागा व इमारत खरेदीचा विषय क्रमांक 9 रद्द करण्याची मागणी अध्यक्षांकडे केली. शिंदे समोर येताच सत्ताधारी गटाचे संचालकही त्यांच्या दिशेने धावले. याचवेळी खालून एक सभासद व्यासपीठावर धावून आला. तो संचालक बजबळे यांच्या अंगावर धावून गेला. दोघांत झटापट झाली. यात दोघेही खाली पडले. दोघांनीही एकमेकांना मारहाण केली. तोपर्यंत इतर संचालकही मदतीला धावले. त्यांनी बजबळे यांना बाजूला काढून त्या शिक्षकाला चोपले. या प्रकाराने सभागृहात अभूतपूर्व गोंधळ उडाला. बंदोबस्तांसाठी केवळ दोनच पोलीस सभागृहात असल्याने शिक्षकांच्या गोंधळ रोखण्यात तेही हतबल ठरले. मारहाण करणाऱ्या शिक्षकाला व्यासपीठावरून अक्षरश: ढकलत खाली काढण्यात आले. याच गोंधळात अध्यक्ष रमेश पाटील यांनी अजेंड्यावरील विषय वाचण्यास सुरुवात केली. अवघ्या दोन मिनिटात त्यांनी अजेंड्यावरील 13 विषय वाचले आणि सभा संपल्याचे जाहीर करून काढता पाय घेतला.


 

Web Title: primary teachers bank meeting in Sangli District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.