पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे सांगली जिल्हा बँकेतील खातेदार मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 07:31 PM2019-06-06T19:31:07+5:302019-06-06T19:33:47+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांची रक्कम मार्चपूर्वी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली होती. नंतर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ठराविक खातेदारांच्या खात्यावर रक्कम जमा झाली. परंतु आजही बहुतांश शेतकरी पहिल्याच हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.

The Prime Minister Farmer's Honor scheme, the account holder of Sangli district bank, is deprived of help | पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे सांगली जिल्हा बँकेतील खातेदार मदतीपासून वंचित

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे सांगली जिल्हा बँकेतील खातेदार मदतीपासून वंचित

Next
ठळक मुद्देजिल्हा बँकेतील खातेदार शासन मदतीपासून वंचितबहुतांश शेतकरी पहिल्याच हप्त्याच्या प्रतीक्षेत

निवास पवार 

शिरटे/सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांची रक्कम मार्चपूर्वी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली होती. नंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ठराविक खातेदारांच्या खात्यावर रक्कम जमा झाली. परंतु आजही बहुतांश शेतकरी पहिल्याच हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर मार्चपूर्र्वी २ हजार रुपये जमा होणार असल्याची घोषणा झाली होती. त्यानुसार राष्ट्रीयीकृत बँक वगळता जिल्हा बँकेतील मोजक्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले. उर्वरित शेतकरी मात्र अजूनही पैसे जमा होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मार्चनंतर राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणाऱ्या शेतकऱ्यांचा दुसरा हप्ताही जमा झाला आहे. त्यामुळे ज्यांना पहिलाच हप्ता मिळालेला नाही, ते मात्र पैसे जमा होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

मात्र शेतकऱ्यांनी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व विकास सोसायटीचे सचिव यांच्याकडे अर्ज सादर केले. त्यांनीही ती यादी वरिष्ठ कार्यालयाकडे सुपूर्द केली. परंतु ज्या शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाहीत, त्यांनी संबंधितांशी चौकशी केली असता, त्यांच्याकडूनही उत्तरे मिळत नाहीत. वंचित शेतकरी ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात चौकशीसाठी हेलपाटे मारून थकले आहेत. प्रशासनाकडून त्यांना योग्य माहिती मिळत नाही, त्यामुळे कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Web Title: The Prime Minister Farmer's Honor scheme, the account holder of Sangli district bank, is deprived of help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.