संकेतने तर बोहनी केली!, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले गौरवोद्गार; राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेत्यांशी साधला संवाद

By संतोष भिसे | Published: August 16, 2022 06:04 PM2022-08-16T18:04:27+5:302022-08-16T18:17:53+5:30

मोदींनी संकेतच्या जखमेची व शस्त्रक्रियेचीही माहिती घेतली.

Prime Minister Narendra Modi praised Sanket Sargar, Interaction with the winners of the Commonwealth Games | संकेतने तर बोहनी केली!, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले गौरवोद्गार; राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेत्यांशी साधला संवाद

संकेतने तर बोहनी केली!, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले गौरवोद्गार; राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेत्यांशी साधला संवाद

googlenewsNext

सांगली : बर्मिंगहॅममध्ये पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत संकेत सरगरने जणू बोहनीच केली, त्यामुळे देशाला भरभरुन पदके मिळू शकली असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. संकतने जखमेकडे दुर्लक्ष करु नये असा सल्लाही दिला.

राष्ट्रकुल स्पर्धेतील स्पर्धेतील पदक विजेत्यांशी मोदी यांनी संवाद साधला. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. पदकांची लयलूट अशीच सुरु ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त केली. या संवादादरम्यान, त्यांनी सांगलीच्या संकेत सरगरचा विशेष उल्लेख केला. राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टींगमध्ये ५५ किलो वजनी गटात संकेतने रौप्य पदक पटकाविले होते. वजन उचलताना त्याच्या उजव्या हाताचा स्नायू दुखावल्याने सुवर्णपदक थोडक्यात हुकले. त्याच्यावर इंग्लंडमध्येच शस्त्रक्रिया करण्यात आली.

मोदींनी संकेतच्या जखमेची व शस्त्रक्रियेचीही माहिती घेतली

तथापि, त्याने मिळविलेले रौप्य पदक भारतासाठी पदकांचे खाते उघडणारे ठरले. खेळाडूंनी जोरदार कामगिरी करत ६१ पदके मिळवून भारताला अग्रेसर ठेवले. याचा गौरवोल्लेख मोदींनी केला. ते म्हणाले, एखाद्या व्यावसायिकाची बोहनी चांगली झाली, तर त्याचा संपूर्ण दिवस, महिना आणि वर्षही व्यापारात चांगले जाते असे म्हंटले जाते. तशीच चांगली बोहनी संकेतने भारतासाठी केली. त्यामुळे देशाला भरपूर पदके मिळाली. मोदींनी संकेतच्या जखमेची व शस्त्रक्रियेचीही माहिती घेतली. इंग्लंडमध्ये शस्त्रक्रिया झाल्यावर पुढील उपचार भारतात होत आहेत, त्यामध्ये काही फरक वाटतो का? अशी विचारणा केली. संकेतने सांगितले की, दोन्ही देशांतील डॉक्टर्स कॉन्फरन्सद्वारे संपर्कात आहेत. परस्परांशी चर्चेतून उपचार करत आहेत.

खेळाडूसाठी त्याचे शरीर ही सर्वात मौल्यवान चीज

मोदी म्हणाले, खेळाडूसाठी त्याचे शरीर ही सर्वात मौल्यवान चीज असते. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतरच्या उपचारांमध्ये हयगय होता कामा नये. यासंदर्भात मी अधिकाऱ्यांशी बोलेन. प्रकृतीकडे दुर्लक्ष होता कामा नये. राष्ट्रकुलमध्ये चांगली बोहनी केल्याबद्दल काय वाटते? त्यावर संकेतने सुवर्णपदक हुकल्याची खंत व्यक्त केली. स्पर्धास्थळी तिरंगा फडकाविण्याच्यी आणि भारताचे राष्ट्रगीत ऐकण्याची इच्छा होती, पण जखमी झाल्याने देशासाठी सुवर्णपदक मिळवू शकलो नाही असे तो म्हणाला.

प्रकृतीकडे दुर्लक्ष नको : मोदी

मोदी म्हणाले की, प्रत्येक खेळाडूला स्वत:च्या शरीराबद्दल अभिमान असतो, तो असायलाच हवा. पण जखम होते, तेव्हा दुर्लक्ष करता कामा नये. प्रकृती कितीही दणकट असली, किंवा सराव चांगला असला तरी दुर्लक्ष होता कामा नये.

Web Title: Prime Minister Narendra Modi praised Sanket Sargar, Interaction with the winners of the Commonwealth Games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.