वाडी-वस्तीवरील लहान कामांना प्राधान्य देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:32 AM2021-09-10T04:32:53+5:302021-09-10T04:32:53+5:30

इस्लामपूर : राजारामबापू पाटील यांनी तालुक्यात सहकारी संस्थांचे जाळे निर्माण करून जनतेचे जीवनमान उंचावले. जयंत पाटील यांनी विकासाला मोठी ...

Priority will be given to small works on Wadi-Vasti | वाडी-वस्तीवरील लहान कामांना प्राधान्य देणार

वाडी-वस्तीवरील लहान कामांना प्राधान्य देणार

Next

इस्लामपूर : राजारामबापू पाटील यांनी तालुक्यात सहकारी संस्थांचे जाळे निर्माण करून जनतेचे जीवनमान उंचावले. जयंत पाटील यांनी विकासाला मोठी चालना दिली. मी सध्या वाडी-वस्त्यावरील लहान-लहान कामे करण्यास प्राधान्य देत आहे. गाताडवाडी, लोणारवाडीसारख्या छोट्या वस्तीवरील पुलाचे काम करू शकलो, याचे मोठे समाधान होत आहे, अशी भावना युवा नेते प्रतीक पाटील यांनी व्यक्त केली.

प्रतीक पाटील यांनी गाताडवाडी-लोणारवाडीमधील करांडे मळ्याकडे जाणाऱ्या पुलाच्या बांधकामाचा पाठपुरावा करून या पुलाचे बांधकाम पूर्ण केले. या पुलाच्या उद्घाटनप्रसंगी या वस्तीवरील अबाल-वृध्द, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित हाेते. यावेळी त्यांनी ‘आता ओढ्यावरून अलीकडे-पलीकडे जाण्याचे आमचे हाल संपले’, अशी भावना व्यक्त केली. हा पूल जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या संकल्पनेतील २५-१५ योजनेतून ८ लाख रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. या पुलाच्या उद्घाटनाचा मान पाटील यांना मिळाला.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित पाटील, पंचायत समितीचे उपसभापती नेताजीराव पाटील, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष संजय पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम पाटील, शिवाजीराव कदम, उपसरपंच मालन करांडे, मोहन करांडे, विनायक पाटील, सागर डवंग, विकास करांडे, गणपती कुठे, संजय जाधव, आकाराम करांडे, रमेश खोत, भीमराव खोत, विकास खोत, किरण खोत, प्रवीण खोत, यशवंत करांडे, वैभव करांडे उपस्थित होते.

संदीप करांडे यांनी स्वागत केले. सुहास खोत यांनी आभार मानले.

फोटो : ०९ इस्लामपुर १

ओळी : गाताडवाडी-लोणारवाडी (ता. वाळवा) येथील करांडे मळ्यावर बांधलेल्या पुलाचे उद्घाटन प्रतीक पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी रणजित पाटील आणि वस्तीवरील महिला व युवक उपस्थित होते.

Web Title: Priority will be given to small works on Wadi-Vasti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.