महापुरावेळी जेलमधून पळालेला कैदी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:24 AM2021-04-14T04:24:35+5:302021-04-14T04:24:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगलीच्या मध्यवर्ती कारागृहातून महापुरावेळी पळून गेलेल्या बंदीस स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले. अमित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगलीच्या मध्यवर्ती कारागृहातून महापुरावेळी पळून गेलेल्या बंदीस स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले. अमित सुधाकर लादे (रा. तडसर, ता. कडेगाव) असे त्याचे नाव आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जिल्ह्यात ऑगस्ट २०१९ मध्ये कृष्णा नदीला महापूर आला होते. यावेळी सांगली शहराचा निम्मा भाग पाण्याखाली गेला होता. राजवाडा चौकातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहासही महापुराने वेढले होते. त्याचा फायदा घेत अमित लादे व त्याचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला होता. या दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गेले दीड वर्षे अमित लादे हा फरार होता. पोलीस त्या दोघांच्या मागावर होते. लादे हा त्याच्या तडसर येथील घरी असल्याची माहिती उपनिरीक्षक दिलीप ढेरे यांना मिळाली. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने तडसर येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. पुढील तपास शहर पोलीस करत आहेत. एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक रवीराज फडणीस, अच्युत सूर्यवंशी, सागर टिंगरे, महादेव नागणे, अरुण सोकटे यांचा कारवाईत सहभाग होता.
...