पृथ्वीराज पवार यांना तीन महिने कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 10:30 PM2018-03-23T22:30:02+5:302018-03-23T22:59:35+5:30
इस्लामपूर (जि.सांगली) : कारंदवाडी (ता. वाळवा) येथील सर्वोदय सहकारी साखर कारखान्याच्या मालकी
इस्लामपूर (जि.सांगली) : कारंदवाडी (ता. वाळवा) येथील सर्वोदय सहकारी साखर कारखान्याच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या संघर्षात राजारामबापू सहकारी साखर कारखान्याची मानहानी केल्याप्रकरणी‘सर्वोदय’चे अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते पृथ्वीराज पवार यांना तीन महिने कारावास व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास त्यांना आणखी महिनाभर कारावास भोगावा लागणार आहे. त्यांना अपिलासाठी १५ दिवसांची मुदत देत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती व्ही. बी. सुपेकर यांनी जामीन मंजूर केला.
पृथ्वीराज हे माजी आमदार संभाजी पवार यांचे पुत्र असून शिवसेनेच्या युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आहेत. सर्वोदय कारखान्याच्या हक्क व अधिकारावरून राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्याशी त्यांचा राजकीय संघर्ष सुरू आहे.