खासगी रुग्णालयांनी स्वतःचा ऑक्सिजन प्लॅन्ट उभारावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:44 AM2021-05-05T04:44:22+5:302021-05-05T04:44:22+5:30

विटा येथे पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. यावेळी आ. अनिल बाबर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य ...

Private hospitals should set up their own oxygen plants | खासगी रुग्णालयांनी स्वतःचा ऑक्सिजन प्लॅन्ट उभारावा

खासगी रुग्णालयांनी स्वतःचा ऑक्सिजन प्लॅन्ट उभारावा

Next

विटा येथे पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. यावेळी आ. अनिल बाबर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : कोरोना रुग्णसंख्या आता आवाक्याबाहेर जाऊ पाहत आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या अनेकांना सध्या ऑक्सिजन कमी पडू लागला आहे. ऑक्सिजन उपलब्धतेसाठी आता खासगी रुग्णालयांनी स्वतःचा ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

येथे सोमवारी रात्री कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री पाटील बोलत होते. यावेळी आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके, पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे, पोलीस निरीक्षक संतोष डोके, मुख्याधिकारी अतुल पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल लोखंडे डॉ. अविनाश लोखंडे उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील यांनी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याची सूचना प्रशासनाला दिली. ते म्हणाले की, होम आयसोलेशनमध्ये असलेले कोरोना रुग्ण घराबाहेर पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. ग्रामपंचायतीने नावांची यादी फलकावर प्रसिद्ध करावी. ग्रामदक्षता समितीने प्रत्येक गावातील शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर सुरू करावे.

प्रांताधिकारी भोर यांनी विटा शहरासह खानापूर तालुक्यातील कोरोना परिस्थितीची, तर तहसीलदार शेळके यांनी तालुक्यात सुरू असलेल्या कोविड रुग्णालयांची, तसेच विविध उपाययोजनांची माहिती दिली. पोलीस उपअधीक्षक इंगळे यांनी पोलीस बंदोबस्त आणि नाकाबंदीची माहिती दिली.

Web Title: Private hospitals should set up their own oxygen plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.