खासगी कार्यालये, सभागृहात आता ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:24 AM2021-03-20T04:24:46+5:302021-03-20T04:24:46+5:30

सांगली : राज्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता शासनाने काही नियम घातले आहेत. त्यात राज्य शासनाने आरोग्य व ...

Private offices, halls now have 50 per cent staff presence | खासगी कार्यालये, सभागृहात आता ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती

खासगी कार्यालये, सभागृहात आता ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती

googlenewsNext

सांगली : राज्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता शासनाने काही नियम घातले आहेत. त्यात राज्य शासनाने आरोग्य व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोरोना स्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे, असेही या आदेशात म्हटले आहे.

जिल्ह्यातील नाट्यगृहे व सभागृहांमध्येही आता ५० टक्के उपस्थिती असणार आहे. त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे. त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

Web Title: Private offices, halls now have 50 per cent staff presence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.