खुंदलापूर वसाहतीमधील समस्यांचा जागीच निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:41 AM2020-12-16T04:41:21+5:302020-12-16T04:41:21+5:30
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील खुंदलापूर-बोरगाव या धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त वसाहतीमध्ये महसूल, पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाऊन, धरणग्रस्त बांधवांचे प्रलंबित प्रश्न ...
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील खुंदलापूर-बोरगाव या धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त वसाहतीमध्ये महसूल, पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाऊन, धरणग्रस्त बांधवांचे प्रलंबित प्रश्न समजून घेतले. त्यातील अनेक प्रश्नांचा जागेवरच निपटारा केल्याने धरणग्रस्तांनी समाधान व्यक्त केले.
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हे विशेष अभियान राबविले जात आहे. या कामासाठी महिन्याचा कालावधी निश्चित केलेला आहे. उपजिल्हाधिकारी गोपीचंद कदम, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अरविंद लाटकर, प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस, शिराळा व वाळवा विभागाचे वनक्षेत्रपाल एस. आर. काळे, सहायक अभियंता डी. डी. परळे, तालुका पुनर्वसन अधिकारी तेजस्विनी पाटील, नायब तहसीलदार श्रीमती सोनवणे, मंडल अधिकारी कैलास कोळेकर, तलाठी प्रकाश पाटील, ग्रामसेवक बादशहा नदाफ यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
या अभियानात घरासाठी प्लॉट, शेतजमीन मिळणे, शेतजमीन मिळाली आहे, मात्र कब्जा मिळाला नाही, तसेच वसाहतीमधील गटारीसह विविध नागरी सुविधांबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. राज्यस्तरावरील प्रश्न जयंत पाटील मार्गी लावणार असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
‘राजारामबापू’चे संचालक कार्तिक पाटील, बॅँकेचे संचालक माणिक पाटील, ‘कृष्णा’चे माजी संचालक उदय शिंदे, मोहन शिंदे यांच्यासह धरणग्रस्त बांधव उपस्थित होते.
फोटो : १५१२२०२०-आयएसएलएम-बोरगाव न्यूज
ओळी :
खुंदलापूर (बोरगाव) येथे धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांचे प्रश्न उपजिल्हाधिकारी गोपीचंद कदम, अरविंद लाटकर यांनी समजून घेतले. यावेळी नागेश पाटील, रवींद्र सबनीस, तेजस्विनी पाटील, एस. आर. काळे, डी. डी.परळे उपस्थित होते.