जिल्ह्यात रास्त भाव दुकानासाठी प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:26 AM2021-03-26T04:26:18+5:302021-03-26T04:26:18+5:30
सांगली : जिल्ह्यामधील ६६ गावांमध्ये नवीन रास्त भाव दुकानांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. दुकान परवान्यासाठी इच्छुक असलेल्यांनी तहसील कार्यालयात ...
सांगली : जिल्ह्यामधील ६६ गावांमध्ये नवीन रास्त भाव दुकानांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. दुकान परवान्यासाठी इच्छुक असलेल्यांनी तहसील कार्यालयात अर्ज द्यावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी केले आहे. जिल्ह्यात वाढीव व रद्द झालेल्या ठिकाणी नवीन दुकानांना परवानगी देण्यात येणार आहे. त्यात आटपाडी - गुळेवाडी, कानकात्रेवाडी, औटेवाडी , तासगाव-बिरणवाडी, शिरगाव कवठे, नागेवाडी, तुरची, कुमठे, मणेराजुरी, चिंचणी, पेड, कडेगाव- ४कोतीज, ढाणेवाडी, खंबाळे औंध, वांगरेठरे, जत- १२ साळमाळगेवाडी, बिरनाळ, बागलवाडी, निगडी खुर्द, मायथळ, सालेकेरी, पांढरेवाडी, सोनलगी, लमाणतांडा उटगी, फुलालवाडी खंडनाळ, राजोबाचीवाडी व्हसपेठ, आबाचीवाडी कोणीकोणूर, वाळवा - १२ खरातवाडी, गोटखिंडी, कुरळप, नरसिंहपूर, महादेववाडी, गाताडवाडी, डोंगरवाडी, देवर्डे, बिचूद, ऐतवडे खुर्द, किल्ले मच्छिंद्रगड, वाटेगाव, खानापूर- ३ देवनगर, रामनगर, कुसबावडे, शिराळा - ९ येसलेवाडी, बेरडेवाडी, भाष्टेवाडी, खुदलापूर, खेड, फकीरवाडी, कोंडाईवाडी, कुसाईवाडी, शिराळा, पलूस - ४ सुखवाडी, तावदरवाडी, राडेवाडी, पुणदीवाडी, कवठेमहांकाळ - ५ नागज, कदमवाडी, कुंडलापूर, हरोली, ढालगाव, मिरज - ६ लक्ष्मीवाडी, मानमोडी, नरवाड, जानराववाडी, पाटगाव, म्हैसाळ याठिकाणी अर्ज करता येणार असल्याचे बारवे यांनी सांगितले.