व्यावसायिकांनी कोरोना टेस्ट करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:27 AM2021-04-23T04:27:48+5:302021-04-23T04:27:48+5:30
आष्टा : आष्टा शहरातील सर्व व्यावसायिकांनी कोरोनाची टेस्ट करून घ्यावी. तसेच लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. कैलास ...
आष्टा : आष्टा शहरातील सर्व व्यावसायिकांनी कोरोनाची टेस्ट करून घ्यावी. तसेच लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी केले आहे.
डॉ. कैलास चव्हाण म्हणाले, आष्टा शहरात खाद्य दुकाने, किराणा, भाजीपाला, दूध विक्रेते, फळविक्रेते, बेकरी, मटण, चिकन, मासे दुकान, कृषी संबंधित सर्व दुकाने १ मे २०२१ पर्यंत फक्त सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू राहणार आहेत. फक्त औषध दुकाने आणि वैद्यकीय दवाखाने नियमित सुरू राहणार आहेत. या सर्व व्यापाऱ्यांचा जनतेशी सतत संपर्क येत असल्याने सर्व व्यापाऱ्यांनी कोरोना टेस्ट तातडीने करून घ्यावी तसेच कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी. ४५ वर्षांच्या वरील सर्व नागरिकांना ग्रामीण रुग्णालय आष्टा या ठिकाणी तसेच दोन खासगी रुग्णालयात लस देण्याचे काम सुरू आहे. सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. अनेक नागरिक विनाकारण फिरताना दिसत आहेत. त्यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येत आहे. टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास त्यांना तत्काळ कोविड रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
पालिकेचे अधिकारी आसावरी सुतार, आर. एन. कांबळे, आनंदा कांबळे, शिरीष काळे, संतोष खराडे, सचिन मोरे यांच्यासह सर्व अधिकारी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे यासाठी मेहनत घेत आहेत.