आटपाडीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राध्यापकास काळे फासले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:31 AM2021-09-06T04:31:04+5:302021-09-06T04:31:04+5:30
आटपाडी : येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या महाविद्यालयातील प्रा. विकास बोडरे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबर गैरवर्तणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. रॅगिंग, ...
आटपाडी : येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या महाविद्यालयातील प्रा. विकास बोडरे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबर गैरवर्तणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. रॅगिंग, लैंगिक शोषण अशी गंभीर कृत्ये केल्याचा आरोप करीत शनिवारी विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बोराडे यांच्या तोंडाला काळे फासले. बाेडरे यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली.
आटपाडी ते दिघंची रस्त्यावर कौठुळी फाट्याजवळ हे महाविद्यालय आहे. प्रा. विकास बाेडरे यांच्याविरोधात विद्यार्थी परिषदेकडे तक्रार आली होती. हे कृत्य प्राध्यापक म्हणून निंदनीय व निषेधार्ह आहे. याची गंभीर दखल घेत विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी प्रथम सर्व विद्यार्थ्यांशी बोलून सर्व विषयाची सखोल चौकशी केली. विद्यार्थ्यांनीदेखील याबाबत माहिती दिल्यानंतर महाविद्यालय बंद करण्यात आले. तसेच प्रा. विकास बोडरे यांना पीडित विद्यार्थ्यांच्या पालकांकडून प्रश्न विचारण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांसमोर प्रा. विकास बोडरे यांनी चुकीची कबुली दिल्यानंतर विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे फासले. महाविद्यालय बंद करून प्राचार्यांना निवेदन दिले. प्रा. बाेडरे यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हा सहसंयोजक विशाल जोशी, बाहुबली छत्रे, विश्वजीत भोसले, अवधूत नलवडे, साहिल शिकलगार, मुजम्मिल शेख व कार्यकर्ते व पीडित विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.