प्रभाग समित्यांच्या सभापती निवडीतही ‘कार्यक्रम’ शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:39 AM2021-02-26T04:39:48+5:302021-02-26T04:39:48+5:30

सांगली : महापौर, उपमहापौर निवडीनंतर आता मार्चमध्ये होणाऱ्या प्रभाग समित्यांच्या सभापती निवडणुकीतही ‘कार्यक्रम’ करण्याची तयारी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीमार्फत सुरू ...

‘Program’ is also possible in the election of ward committee chairpersons | प्रभाग समित्यांच्या सभापती निवडीतही ‘कार्यक्रम’ शक्य

प्रभाग समित्यांच्या सभापती निवडीतही ‘कार्यक्रम’ शक्य

Next

सांगली : महापौर, उपमहापौर निवडीनंतर आता मार्चमध्ये होणाऱ्या प्रभाग समित्यांच्या सभापती निवडणुकीतही ‘कार्यक्रम’ करण्याची तयारी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीमार्फत सुरू आहे. दुसरीकडे भाजपने सतर्कता बाळगली आहे. नाराज भाजप नगरसेवकांच्या भूमिकेवर सभापतिपदाचे चित्र अवलंबून राहणार आहे.

महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार संख्याबळानुसार सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, स्थायी समिती सभापतिपदावर आहे तेच नेते राहतील. मात्र भाजपने दुर्लक्ष केल्यास मार्चमध्ये होणाऱ्या प्रभाग समिती दोन आणि चारच्या निवडणुकीत भाजपला धक्का बसू शकतो. या समित्या त्यांच्या ताब्यातून जाऊ शकतात. भाजपमधील १८हून अधिक नगरसेवक पक्षावर नाराज असल्याने त्यांची भूमिका प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे.

सांगली महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत सात बंडखोर नगरसेवकांमुळे सत्ताधारी भाजपला पदे गमवावी लागली. भाजपविरोधात मतदान करणारे सातही बंडखोर नगरसेवकांसह अन्य भाजपचे नाराज सदस्य काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरच राहिले तर भाजपची चार सभापतिपदे धोक्यात येऊ शकतात. प्रभाग समिती क्रमांक दोन आणि चार तसेच समाजकल्याण समितीचे सभापतिपद काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मिळू शकते.

महापालिकेच्या चारही प्रभाग समिती सभापतींचा कालावधी दि. ३१ मार्च रोजी संपत आहे. प्रभाग समिती क्रमांक एकमध्ये भाजपचे १२ आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सहा नगरसेवक आहेत. या समितीतील भाजपच्या अपर्णा कदम यांनी महापौर निवडणुकीत आघाडीला मतदान केले आहे. हे मत फुटले तरी ही समिती भाजपकडेच राहील. प्रभाग समिती क्रमांक दोनमध्ये भाजपचे १२ व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे आठ नगरसेवक आहेत. या समितीतील भाजपच्या स्नेहल सावंत, महेंद्र सावंत आणि नसिम नाईक यांनी महापौर निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराला मतदान केले आहे. प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत ते आघाडीच्या बाजूने राहिले, तर भाजपचे सभापतिपद जाऊ शकते.

प्रभाग समिती क्रमांक तीनमध्ये १६ पैकी १० नगरसेवक काँग्रेस-राष्ट्रवादीचे आहेत. हे सभापतिपद पहिल्यापासूनच काँग्रेस-राष्ट्रवादीकडे राहिले आहे. प्रभाग समिती चारमध्ये भाजपचे १२ व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे ११ नगरसेवक आहेत. भाजपच्या बारा नगरसेवकांपैकी शिवाजी दुर्वे व आनंदा देवमाने हे दोन नगरसेवक महापौर, उपमहापौर निवडणुकीत मतदानाला तटस्थ होते. त्याची पुनरावृत्ती झाल्यास प्रभाग समिती चारचे सभापतिपदही काँग्रेस-राष्ट्रवादीकडे जाईल.

Web Title: ‘Program’ is also possible in the election of ward committee chairpersons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.