एमएचटी-सीईटी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 11:31 AM2020-09-30T11:31:15+5:302020-09-30T11:32:12+5:30
सांगली जिल्ह्यात 5 परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने एमएचटी-सीईटी परीक्षा-2020 घेण्यात येणार आहे. केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटरच्या सभोवतालच्या परिसरात 144 लागू केले आहे.
सांगली : सांगली जिल्ह्यात 5 परीक्षा केंद्रावर 1 ते 9 ऑक्टोबर 2020 व दि. 12 ते 20 ऑक्टोबर 2020 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने एमएचटी-सीईटी परीक्षा-2020 घेण्यात येणार आहे.
जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटरच्या सभोवतालच्या परिसरात परीक्षेच्या दिनांकास 7.00 वाजल्यापासून ते 20.00 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले असून एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे.
या आदेशानुसार वरील वेळेत दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी फिरण्यास मनाई केली आहे. एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे.
या वेळेत परिक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशीन, ध्वनीक्षेपक यांचा परिक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच परिक्षा केंद्रात मोबाईल, पेजर नेण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही.
परीक्षा केंद्राचे नाव पुढीलप्रमाणे.
राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, राजाराम नगर साखराळे इस्लामपूर ता. वाळवा, आदर्श इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खंबाळे (भा.) एमआयडीसी खानापूर-विटा, पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलीक्लिनिक विंग सांगली-तासगाव रोड बुधगाव ता. मिरज, आण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ॲन्ड टेक्नॉलॉजी आष्टा, ता. वाळवा, पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सांगली-तासगाव रोड बुधगाव ता. मिरज.
या परीक्षा केंद्रावर दिनांक 1 ते 09 ऑक्टोबर 2020 व दि. 12 ते 20 ऑक्टोबर 2020 या दिनांकास प्रथम सत्र सकाळी 7.30 ते 12.00 व व्दितीय सत्र दुपारी 12.30 ते 6.45 या वेळेत होणार आहे.