‘आरआयटी’मध्ये संशोधनासाठी प्रोत्साहन देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:23 AM2020-12-08T04:23:16+5:302020-12-08T04:23:16+5:30
इस्लामपूर : आरआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला चालना देणारे शिक्षण दिले जाते. त्याची प्रचिती पदविका (डिप्लोमा) विभागाच्या प्रकल्प प्रदर्शनातून मिळते. ...
इस्लामपूर : आरआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला चालना देणारे शिक्षण दिले जाते. त्याची प्रचिती पदविका (डिप्लोमा) विभागाच्या प्रकल्प प्रदर्शनातून मिळते. विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांच्या प्रयत्नातून भरविण्यात आलेले प्रदर्शन कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांना यापुढेही संशोधनासाठी प्रोत्साहन दिले जाईल, असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. सुषमा कुलकर्णी यांनी केले.
येथील आरआयटीमध्ये पदविका विभागाच्या छोट्या आणि मोठ्या प्रकल्पांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या आवडीप्रमाणे हे प्रकल्प देण्यात आले होते. पदविका विभागाचे प्रमुख डॉ. एच. एस. जाधव यांनी प्रदर्शनाचे आयोजन केले.
या प्रकल्प प्रदर्शनात इलेक्ट्रिकल विभागातून सोलर ग्रास कटर, अॅटोमेटिक सीड सोईंग मशीन, इंड्रस्ट्रियल टेंपरेचर कंट्रोलर, अॅटोमेटिक स्ट्रिटलाईट, पाईप अर्थिंग मॉडेल, सिव्हिल विभागातून दरवाजा व खिडक्या, रूफ ट्रस, ग्रीन बिल्डिंगचे साहित्य व प्रकार, फरशांच्या दराचे विश्लेषण, रेल्वे गेजचे प्रकार असे प्रकल्प ठेवण्यात आले होते. तसेच मेकॅनिकलमधून न्यूमॅटिक कपॅसिटर, सिग्मा कपॅसिटर, अॅटोमोबाईलमधून टू स्ट्रोक, फोर स्ट्रोक इंजिन मॉडेल, सोलर वॉटर हिटिंग सिस्टिम, एलपीजी कीट, रोड सेफ्टी अशा प्रकारचे प्रकल्प ठेवण्यात आले होते.
फोटो ०७१२२०२०-आयएसएलएम-आरआयटी न्यूज
इस्लामपूर येथील आरआयटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रकल्प प्रदर्शनाची पाहणी प्राचार्या डॉ. सुषमा कुलकर्णी यांनी केली. डॉ. एच. एस. जाधव उपस्थित होते.