जीएसटी पोर्टलचा व्यावसायिकांना भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:09 AM2019-11-23T00:09:18+5:302019-11-23T00:09:23+5:30

सांगली : जीएसटी रिटर्न्स भरण्याच्या शेवटच्या दोन दिवसात जीएसटी पोर्टल मंदावले. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो व्यावसायिकांची रिटर्न्स मुदतीत जमा होऊ ...

Promotion of GST Portal | जीएसटी पोर्टलचा व्यावसायिकांना भुर्दंड

जीएसटी पोर्टलचा व्यावसायिकांना भुर्दंड

Next

सांगली : जीएसटी रिटर्न्स भरण्याच्या शेवटच्या दोन दिवसात जीएसटी पोर्टल मंदावले. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो व्यावसायिकांची रिटर्न्स मुदतीत जमा होऊ शकली नाहीत. त्यांना आता दंडासह ती जमा करावी लागतील. दरम्यान, पोर्टल मंदावल्याची तक्रार जीएसटी विभागाने फेटाळली आहे.
आॅक्टोबरचे जीएसटी रिटर्न्स भरण्यासाठी वीस नोव्हेंबर ही अंतिम मुदत होती. सर्रास व्यावसायिक प्रत्येक महिन्यात मुदतीच्या शेवटच्या तीन-चार दिवसांत रिटर्न्स जमा करतात. या महिन्यात पोर्टलवर प्रचंड ताण येऊन ते मंदावले. १८, १९ आणि २० नोव्हेंबर या तीन दिवसात पोर्टलवर रिटर्न्स अपेक्षित गतीने जमा करता आली नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. सायंकाळी पोर्टल बंद होईपर्यंत अनेकांची रिटर्न्स जमा होऊ शकली नाहीत. आता त्यांना दंडासह ती जमा करावी लागतील. महिन्याभराची उलाढाल शून्य असेल, तर वीस रुपये दंड होईल. उलाढाल झाली असेल, तर पन्नास रुपये भरावे लागतील. पोर्टल मंदावल्याचा नाहक भुर्दंड व्यावसायिकांना भरावा लागेल.
दरम्यान, पोर्टल मंदावल्याची तक्रार जीएसटी विभागाने फेटाळली आहे. केंद्रीय जीएसटीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, १९ नोव्हेंबररोजी साडेअकरा लाख रिटर्न्स फाईल झाल्या आहेत. पोर्टलवर सर्वोच्च ताण असल्याच्या काळातही १ लाख ८२ हजार रिटर्न्स भरली गेली आहेत. २० नोव्हेंबररोजी दुपारी चार वाजेपर्यंत ९ लाख २३ हजारांपेक्षा अधिक जमा झाली. एकाचवेळी दीड लाख रिटर्न्स फाईल्स करुन घेण्याची पोर्टलची क्षमता आहे. बुधवारी (दि. २०) दुपारी चारपर्यंत ५५ लाख ७९ हजारांपेक्षा जास्त प्रकरणे देशभरात जमा झाली आहेत. पोर्टल मंदावले असते तर इतकी प्रकरणे जमा झाली नसती. तरीही करदात्यांनी शेवटच्या दोन-तीन दिवसांपर्यंत न थांबता लवकर जमा करावीत.
दरम्यान, गतवर्षीच्या नोव्हेंबरमध्ये भरलेल्या एकूण प्रकरणांच्या तब्बल निम्मी प्रकरणे गेल्या दोन दिवसात एकाचवेळी भरली गेल्याने हा ताण आला असल्याचे अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे.

Web Title: Promotion of GST Portal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.