ग्रामीण भागाच्या समस्या सोडविण्यासाठी योग्य कामाला प्राधान्य द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:27 AM2021-01-23T04:27:11+5:302021-01-23T04:27:11+5:30
कामेरी : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्या संपर्कात राहून योग्य कामाला प्राधान्य द्यावे. आपण सर्वोताेपरी ...
कामेरी : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्या संपर्कात राहून योग्य कामाला प्राधान्य द्यावे. आपण सर्वोताेपरी सहकार्य करू, असे आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी दिले.
ते इटकरे (ता. वाळवा) येथील जिल्हा परिषदेच्या जलसुविधा योजनेतून करण्यात आलेल्या नांगरे पाटील रस्त्यावरील पेव्हिंग ब्लॉकची पाहणी करून त्याचे उद्घाटन करताना बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील, सरपंच वैशाली पवार, उपसरपंच संदीप पाटील, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष रणजित जाधव, शामराव पाटील, नंदकुमार पाटील, बाळासाहेब पाटील, जगन्नाथ पाटील, बाबूराव पवार, अविनाश पाटील, रणजित पाटील, रोहित पाटील, सयाजी पाटील, अशोक पाटील, ग्रामसेवक संपत साळुंखे, सागर सुतार, अशोक माने उपस्थित होते.
फोटो -२२०१२०२१-आयएसएलएम-कामेरी न्यूज
इटकरे (ता. वाळवा) येथे रस्ता उद्घाटन प्रसंगी खासदार धैर्यशील माने, अभिजीत पाटील, वैशाली पवार, संदीप पाटील उपस्थित हाेते.