शेतीच्या पाण्याचे योग्य नियोजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:55 AM2020-12-11T04:55:13+5:302020-12-11T04:55:13+5:30
शिराळा : कोरोनामुळे अडचणीतून जाणाऱ्या बळीराजाला येणारा उन्हाळा सुखकारक जावा, त्याची पिके पाण्याविना वाळणार नाहीत, याची खबरदारी घेऊन अधिकाऱ्यांनी ...
शिराळा : कोरोनामुळे अडचणीतून जाणाऱ्या बळीराजाला येणारा उन्हाळा सुखकारक जावा, त्याची पिके पाण्याविना वाळणार नाहीत, याची खबरदारी घेऊन अधिकाऱ्यांनी शिराळा-वाळव्यातील शेती पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
शिराळा येथील तहसीलदार कार्यालयात वारणा मुख्य व डावा कालवा, वाकुर्डे बुद्रुक योजना, मोरणा धरण तसेच सर्व मध्यम प्रकल्पांतून शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्यप्रकारे वाटप करण्याबाबत पाणी वाटप समितीची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. तहसीलदार गणेश शिंदे प्रमुख उपस्थित होते.
आमदार नाईक म्हणाले, वीज वितरण कंपनीने ज्या काळात उपसा चालू असेल, त्या काळात वीज पुरवठा खंडित होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. या काळात दुरुस्तीची कामे काढू नयेत. पाटबंधारे विभागाचे मोरणा, शिवणी, रेठरेधरण, भटवाडी, अंत्री, कार्वे तलाव मार्चपर्यंत भरून घ्यावेत. टाकवे व रेठरेधरण ल. पां. तलाव व शिवणी तलावात असलेल्या सांडव्यातील कालव्याच्या दुरुस्तीचे प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे सादर करावेत, आदी सूचना त्यांनी केल्या.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, वारणा डावा कालवा क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, पाटबंधारे उपविभाग इस्लामपूरचे उपविभागीय अभियंता एल. बी. मोरे, शाखा अभियंता सी. बी. यादव, एस. के. पाटील, वीज वितरण कंपनीचे उपअभियंता प्रल्हाद बुचडे, संजय जाधव, सचिन मोहिते, तुकाराम आटुगडे आदी उपस्थित होते.
फोटो-09shirala01
फोटो ओळी : शिराळा येथे बैठकीत आमदार मानसिंगराव नाईक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गणेश शिंदे, रोहित बांदिवडेकर, देवाप्पा शिंदे आदी उपस्थित होते.