मालमत्ता जप्ती टळली, निर्बंध लागू : सांगली वसंतदादा बँक घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:48 AM2017-11-17T00:48:07+5:302017-11-17T00:55:31+5:30
सांगली : अवसायनातील वसंतदादा बँकेच्या २४७ कोटी ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी माजी संचालक मदन पाटील यांच्या वारसदारांच्या मालमत्तांवरील जप्तीची कारवाई रद्द
सांगली : अवसायनातील वसंतदादा बँकेच्या २४७ कोटी ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी माजी संचालक मदन पाटील यांच्या वारसदारांच्या मालमत्तांवरील जप्तीची कारवाई रद्द करतानाच, मालमत्तांच्या व्यवहारावर निर्बंध लागू करण्याचे आदेश पुणे येथील राज्य सहकारी अपिलीय न्यायालयाने दिले आहेत.
चौकशी अधिकाºयांनी मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील आणि दोन मुलींच्या नावे असलेल्या दहा मालमत्तांच्या जप्तीचे आदेश दिले होते. त्यासंदर्भात जयश्रीताई पाटील यांनी न्यायालयात अपील केले होते. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने म्हटले आहे की, जप्तीची कारवाई रद्द केली आहे. त्याचबरोबर तिन्ही वारसदारांच्या दहा मालमत्तांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. या मालमत्तांचे हस्तांतरण करू नये, बोजा चढवू नये व त्रयस्थ व्यक्ती अगर संस्थेला त्या जागेचे अधिकार देण्यात येऊ नयेत, असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे जप्ती टळली तरी, मालमत्तांवर निर्बंध आले आहेत.
सहकारी बँकिंग क्षेत्रात दबदबा असणाºया वसंतदादा बँकेतील तत्कालीन संचालक, अधिकाºयांनी नियमबाह्य व असुरक्षित कर्जवाटप केले होते. तीनशे कोटींहून अधिकच्या कर्ज प्रकरणांत आक्षेप नोंदविण्यात आले होते. कलम ७२ (३) प्रमाणे अंतिम झालेल्या चौकशीत १०७ खात्यांमधील २४७ कोटी ७५ लाखांच्या रकमेबाबत आरोप ठेवले होते.
दोषारोप पत्रावरील सुनावणीचे काम अंतिम टप्प्यात आले असतानाच, या प्रकरणातील काँग्रेस नेत्या जयश्रीताई यांची मालमत्ता विक्रीस काढली होती. वृत्तपत्रात त्याविषयीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल चौकशी अधिकाºयांनी घेतली.
भविष्यातील वसुलीच्या कारवाईस अडथळा निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास आल्याने, चौकशी अधिकाºयांनी महाराष्टÑ सहकारी अधिनियम १९६0 च्या कलम ८८ व ९५ मधील तरतुदीनुसार जयश्रीताई यांच्यासह त्यांच्या दोन मुलींच्या नावावर असलेल्या दहा मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासंदर्भातील नोटिसाही त्यांना पाठविण्यात आल्या होत्या. महसूल विभागालाही मालमत्ता जप्तीबाबत कळविले होते. चौकशी अधिकाºयांच्या निर्णयाविरोधात अपील दाखल केले होते.
एकाच माजी संचालकाबाबत आदेश...
एकाच माजी संचालकाच्या वारसदारांनी मालमत्ता विक्रीचा प्रयत्न केल्याने, सर्वच माजी संचालक अशी कृती करतील, असा निष्कर्ष काढता येणार नाही, असा युक्तिवाद काहींनी केला होता. तो ग्राह्य धरून चौकशी अधिकाºयांनी मदन पाटील यांच्या तिन्ही वारसदारांच्या दहा मालमत्ता जप्त करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. कवलापूर, पद्माळे आणि सांगलीतील दहा मालमत्तांचा यात समावेश आहे.चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांच्यासमोर सुरू असलेली कलम ८८ ची सुनावणी आता २४ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे सांगितले.