अनुसूचित जाती योजनेसाठी ५८ कोटींचे प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:48 AM2021-02-18T04:48:38+5:302021-02-18T04:48:38+5:30
समाजकल्याण समितीच्या बैठकीनंतर सभापती शेंडगे बोलत होते. ते पुढे म्हणाले, अनुसूचित जाती व नवबौद्ध योजना समाजकल्याण विभागाच्या वतीने राबवण्यात ...
समाजकल्याण समितीच्या बैठकीनंतर सभापती शेंडगे बोलत होते. ते पुढे म्हणाले, अनुसूचित जाती व नवबौद्ध योजना समाजकल्याण विभागाच्या वतीने राबवण्यात येते. या योजनेसाठी जिल्ह्याला ४५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. उपलब्ध निधीपेक्षा प्रस्ताव मोठ्या संख्येने दाखल आहेत. त्यासाठी ५८ कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. त्यामुळे प्राप्त प्रस्तावांची छाननी करण्याचे आदेश देण्यात आले. अनुसूचित जाती योजनेसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो. ही कामे ग्रामपंचायतीमार्फत केली जातात. मोठ्या प्रमाणात निधी देऊनही अनेक कामे प्रलंबित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. दिव्यांग व्यक्तींसाठी पिठाची चक्की देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी २७ लाखांची तरतूद केली. प्रत्येक लाभार्थी १३ हजार रुपयांप्रमाणे अनुदान देण्यात येईल. याशिवाय दिव्यांगांसाठी शेळी वाटप करण्यासाठी ५० लाखांची तरतूद केली. प्रतिलाभार्थी दोन शेळ्यांसाठी सहा हजार रुपयांप्रमाणे १२ हजारांचे अनुदान देणार आहे. मागासवर्गीय स्त्री-पुरुषांना पिठाची चक्की देण्यात येणार आहे. त्यासाठी ४७ लाख रुपयांची तरतूद आहे. त्यासाठी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
यावेळी मनोज मंडगनूर, सरदार पाटील, अश्विनी पाटील, नीलम सकटे, राजश्री एटम, प्रभारी जिल्हा समाजकल्याण अधिकारी संभाजी पोवार, आदी उपस्थित होते.