जत तालुक्यात प्रस्तावित रेल्वे मार्ग सर्वेक्षण नामंजूर-: मिरज-विजयपूर, पंढरपूर-विजयपूर मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 10:21 PM2019-03-28T22:21:34+5:302019-03-28T22:21:42+5:30

जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी २०१४ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी पाठपुरावा करून मिरज-जत-विजयपूर (१२२ कि.मी.) आणि पंढरपूर-उमदी-

Proposed railway route survey in Jat taluka: - Miraj-Vijaypur, Pandharpur-Vijaypur road | जत तालुक्यात प्रस्तावित रेल्वे मार्ग सर्वेक्षण नामंजूर-: मिरज-विजयपूर, पंढरपूर-विजयपूर मार्ग

जत तालुक्यात प्रस्तावित रेल्वे मार्ग सर्वेक्षण नामंजूर-: मिरज-विजयपूर, पंढरपूर-विजयपूर मार्ग

Next
ठळक मुद्देकेंद्राचा निर्णय

जत : जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी २०१४ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी पाठपुरावा करून मिरज-जत-विजयपूर (१२२ कि.मी.) आणि पंढरपूर-उमदी-विजयपूर (१०८.२४ कि.मी.) हे दोन्ही रेल्वे मार्ग सर्वेक्षण करण्यासाठी मंजूर करून घेतले होते. परंतु विद्यमान केंद्र सरकारने हे प्रस्ताव नामंजूर केले आहेत. त्यामुळे तालुक्यामधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पंढरपूर-उमदी-विजयपूर या जत तालुक्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यासाठी एक हजार २९४ कोटी ६९ लाख रुपयांची आर्थिक तरतूद करून अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला होता. या दोन्ही रेल्वे मार्गांचा पाठपुरावा खा. संजयकाका पाटील व आ. विलासराव जगताप यांनी २०१८ मध्ये रेल्वे मंत्रालयाकडे केला होता. त्यामुळे या दोन्ही रेल्वे मार्गांच्या कामाला गती मिळाली होती. परंतु रेल्वे बोर्डाने नोव्हेंबर २०१८ मध्ये हे दोन्ही रेल्वेमार्ग नामंजूर केले आहेत, असे लोकप्रतिनिधींना कळविले आहे.

मागील पाच वर्षांत जत तालुक्यात कºहाड-तासगाव-जत (एनएच २६६), गुहागर-विजापूर (एनएच १६६ ई), इंदापूर-जत (एनएच ९६५ जी), पंढरपूर-उमदी-विजापूर (एनएच ५१६ अ) या राष्ट्रीय महामार्गांची कामे सुरू झाली आहेत. गोकाक-अथणी-जत या राष्ट्रीय महामार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम विजयपूर येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात सुरू आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे काम सुरू होणार आहे. जत तालुका भौगोलिक विस्ताराने मोठा आहे. सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय महामार्गाबरोबर जत आणि उमदी येथून जाणारी रेल्वे होणे गरजेचे होते. परंतु हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे जत तालुका पुन्हा विकासापासून वंचित राहणार, अशी भीती व्यक्त होत आहे.

विकासाला : बसली खीळ
तालुक्यातून रेल्वे मार्ग जात नसल्यामुळे डाळिंब, द्राक्षे, बोर, केळी आदी शेतीमाल शहरात पाठवताना शेतकरी आणि व्यापाऱ्यांना त्रासदायक व खर्चिक ठरत आहे. कच्चा माल या भागात येण्यासाठी दळणवळण व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे उद्योजक या ठिकाणी नवीन उद्योगधंदे उभे करायला तयार होत नाहीत. या भागातील सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळत नाही. त्यामुळे हे लोक स्थलांतर करत आहेत. ऊसतोडी, वीटभट्टी, दगड खोदकाम यासह छोट्या-मोठ्या कामांसाठी शहरी भागात लोकांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत आहे.

Web Title: Proposed railway route survey in Jat taluka: - Miraj-Vijaypur, Pandharpur-Vijaypur road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.