समृध्दी पॉलिएक्स्ट्रूजपनला आग; अडीच कोटींचे नुकसान

By admin | Published: April 17, 2016 12:36 AM2016-04-17T00:36:41+5:302016-04-17T00:42:51+5:30

शॉर्टसर्किटने दुर्घटना : सरकी बियाणे, पेंड, बारदान जळून खाक

Prosperity polytextrose fire; 25 crore losses | समृध्दी पॉलिएक्स्ट्रूजपनला आग; अडीच कोटींचे नुकसान

समृध्दी पॉलिएक्स्ट्रूजपनला आग; अडीच कोटींचे नुकसान

Next

कुपवाड : मिरज औद्योगिक वसाहतीमधील समृध्दी पॉलिएक्स्ट्रूजन या सरकी पेंड आणि आॅईल तयार करणाऱ्या कारखान्याला शुक्रवारी मध्यरात्री शॉर्टसर्किटने भीषण आग लागली़ आगीत सरकी बियाणे, पेंड, बारदान जळून सुमारे अडीच कोटींचे नुकसान झाले. याप्रकरणी कुपवाड पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता़
जयसिंगपूर येथील शशिकांत गुलाबचंद मालू यांच्या मालकीचा मिरज औद्योगिक वसाहतीमधील समृद्धी पॉलिएक्स्ट्रूजन हा कारखाना आहे. २०१२ मध्ये सुरू झालेला हा कारखाना गेल्या चार दिवसांपासून बंद ठेवण्यात आला होता़ शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास कारखान्यात शॉर्टसर्किट होऊन आग लागली़ आत सरकी पेंड, बारदानचा मोठा साठा असल्याने आग भडकली़ आगीने रौद्र रूप धारण केल्यावर लगतच्या कारखान्यातील कामगार व रखवालदाराने एमआयडीसी पोलिस ठाणे आणि एमआयडीसीच्या अग्निशमन केंद्रास माहिती दिली़ त्यांच्यासह महापालिकेच्या अग्निशामन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले़ एमआयडीसी, महापालिका, तासगाव नगरपालिकेच्या अग्निशामन बंबांनी ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. आग शनिवारी रात्रीपर्यंत धुमसत होती़
आगीमध्ये साडेसातशे टन सरकी बियाणे, शंभर टन पेंड, साठ हजार बारदान (पोती) जळून खाक झाली़ कारखान्याच्या शेडचेही नुकसान झाले आहे़ घटनेची माहिती मिळताच कारखान्याचे मालक शशिकांत मालू, महापालिकेचे अग्निशामन अधिकारी शिवाजीराव दुधाळ, सांगली- मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे व्यवस्थापक गणेश निकम आदींनी धाव घेतली़ घटनास्थळी बघ्यांनीही गर्दी केली होती़ याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता़ (वार्ताहर)
 

Web Title: Prosperity polytextrose fire; 25 crore losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.