शिराळ्यात रासायनिक खत दरवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:28 AM2021-05-20T04:28:03+5:302021-05-20T04:28:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिराळा तालुका राष्ट्रवादीतर्फे केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल, रासायनिक खते, घरगुती वापरासाठीच्या गॅस सिलिंडरच्या ...

Protest against chemical fertilizer price hike in Shirala | शिराळ्यात रासायनिक खत दरवाढीचा निषेध

शिराळ्यात रासायनिक खत दरवाढीचा निषेध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : शिराळा तालुका राष्ट्रवादीतर्फे केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल, रासायनिक खते, घरगुती वापरासाठीच्या गॅस सिलिंडरच्या दरवाढीच्या निषेधार्थ आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयाच्या दारात केंद्र सरकारचा जाहीर निषेध करून निदर्शने केली. यावेळी ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी, ती न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला.

आमदार नाईक यांनी केंद्र सरकारने केलेली दरवाढ सर्वसामान्य व शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. कोरोना महामारीने अगोदरच कंबरडे मोडले आहे. त्यातच केलेली दरवाढ केंद्र सरकारने त्वरित मागे घ्यावी. ती न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, प्रचिती दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंग नाईक, युवा नेते विराज नाईक, माजी सभापती सम्राटसिंग नाईक, नगराध्यक्षा सुनीता निकम, प्रकाश धस, वैशाली माने, बी. के. नायकवडी, दिनकरराव पाटील, विश्वास पाटील, सुरेश पाटील, विश्वास कदम, डॉ. राजाराम पाटील, बिरुदेव आमरे, मानसिंग पाटील, उपनगराध्यक्ष विजय दळवी, सुनील कवठेकर, नंदाताई पाटील, राहुल पवार, पौर्णिमा पवार, प्रथमेश शिंदे, नगरसेवक कीर्तीकुमार पाटील, संजय हिरवडेकर, ॲड. विलास झोळे, तात्यासो पाटील, अनिरुद्ध नलवडे, गजानन पाटील, आदी उपस्थित होते.

Web Title: Protest against chemical fertilizer price hike in Shirala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.