राष्ट्रविकास सेनेमार्फत शासनाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:30 AM2021-03-09T04:30:37+5:302021-03-09T04:30:37+5:30
सांगली : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ गेली सहा वर्षांपासून बंद अवस्थेत आहे त्या महामंडळात कुठल्याही प्रकारच्या ...
सांगली : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ गेली सहा वर्षांपासून बंद अवस्थेत आहे त्या महामंडळात कुठल्याही प्रकारच्या निधीची तरतूद करण्यात राज्य शासनाने केली नाही. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षातच शासनाने दुर्लक्ष केल्याने राष्ट्रविकास सेनेने राज्य शासनाचा निषेध केला.
याबाबत राष्ट्र विकास सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष प्रशांत सदामते यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, अण्णाभाऊ साठे यांचे २०२० ते २०२१ हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने मागील सरकारने १०० कोटींची तरतूद केली, पण सोमवारच्या अधिवेशनात कोणत्याही प्रकारचा निधी जाहीर केला नाही.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ४०० कोटीची तरतूद केली, याचा आम्हाला अभिमान आहे. ही आनंदाची गोष्ट आहे, परंतु साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राचे साहित्यिक होते. त्यामुळे त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या स्मारकासाठी भरीव तरतूद करणे आवश्यक होते. ते न केल्याने आम्ही शासनाचा निषेध व्यक्त करत आहोत.