मिरजेत मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्य व केंद्र सरकारविरोधात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:28 AM2021-05-06T04:28:26+5:302021-05-06T04:28:26+5:30
मिरज : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्याने मिरजेत मराठा क्रांती मोर्चातर्फे निदर्शने करून राज्य व ...
मिरज : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्याने मिरजेत मराठा क्रांती मोर्चातर्फे निदर्शने करून राज्य व केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलास देसाई यांनी राज्य व केंद्र सरकार यास सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप केला. मराठा मुला-मुलींचे भविष्य न्यायालयाच्या या निर्णयामुळे अंधारात गेले आहे. राज्यातील सर्वच पक्षांनी मराठा समाजाचा वापर केवळ राजकीय फायद्यासाठीच केला असल्याने आता कोणत्याच राजकीय पक्षाचे बाहुले न होता मराठा समाजाच्या आता स्वतंत्र पक्षाची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मराठा समाजाने आत्तापर्यंत अहिंसक मार्गाने ५८ मोर्चे काढले. मात्र न्यायालयाने आरक्षण रद्द केल्याने भारतीय राज्यघटनेतील समानतेवरील विश्वास संपला आहे. मराठा समाजाला दुःखाच्या खाईत लोटण्याचे काम आजच्या निर्णयाने झाले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केली. विलास देसाई, धनंजय हलकर, विजय धुमाळ, संतोष माने आंदोलनात सहभागी होते.