इस्लामपुरात महिला राष्ट्रवादीची गॅस दरवाढीविरुद्ध निर्दशने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:24 AM2020-12-23T04:24:00+5:302020-12-23T04:24:00+5:30
इस्लामपूर : केंद्र सरकारने लवकरात-लवकर गॅस दरवाढ कमी करून सर्वसामान्य माणसांना दिलासा द्यावा, अन्यथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री ...
इस्लामपूर : केंद्र सरकारने लवकरात-लवकर गॅस दरवाढ कमी करून सर्वसामान्य माणसांना दिलासा द्यावा, अन्यथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला.
शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गॅस दरवाढ विरोधात तीव्र निदर्शने करीत नायब तहसीलदार धनश्री भांबुरे यांना निवेदन देण्यात आले. रोझा किणीकर म्हणाल्या, कोरोना काळात अनेक उद्योग-व्यवसाय बंद पडलेले आहेत. यामुळे अनेकांचा रोजगार, नोकऱ्या गेलेल्या आहेत. सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यातच केंद्र शासनाने एक महिन्यात दोन वेळा गॅस दरवाढ करून सामान्य जनतेला आर्थिक भुर्दंड बसविला आहे. केंद्र सरकारने गॅस दरवाढ तातडीने मागे घ्यावी.
यावेळी शहर उपाध्यक्षा मनीषा पेठकर, सविता पाटील, मालन वाकळे, सुवर्णा जगताप, पुष्पलता खरात, सुनंदा साठे, प्रतिभा पाटील, गीता पाटील, रूपाली पाटील, सुनीता काळे, प्रियांका साळुंखे, सुप्रिया पेठकर, मनाली वडार उपस्थित होत्या.
फोटो : २२१२२०२०-आयएसएलएम-इस्लामपूूर निवेदन न्यूज
ओळी : इस्लामपूर येथे शहर महिला राष्ट्रवादीच्यावतीने नायब तहसीलदार धनश्री भांबरे यांना शहराध्यक्षा रोझा किणीकर, पुष्पलता खरात यांनी निवेदन दिले. यावेळी मनीषा पेठकर, सविता पाटील, मालन वाकळे, प्रियांका साळुंखे, रूपाली पाटील उपस्थित होत्या.