पाण्याची चणचण दूर करण्यासाठी बांबवडेस टँकर प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:27 AM2021-04-24T04:27:00+5:302021-04-24T04:27:00+5:30
पलूस : उन्हाळ्यात पाण्याची चणचण भासू नये म्हणून बांबवडे (ता. पलूस) ग्रामपंचायतीसाठी जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांच्या स्वीय ...
पलूस : उन्हाळ्यात पाण्याची चणचण भासू नये म्हणून बांबवडे (ता. पलूस) ग्रामपंचायतीसाठी जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांच्या स्वीय निधीतून पाण्याच्या टँकर देण्यात आला. या टँकरचे पूजन त्यांच्याहस्ते करण्यात आले.
शरद लाड म्हणाले की, आ. अरुण लाड यांच्या प्रयत्नातून ३० लाख रुपये बांबवडेतील अंतर्गत पायाभूत सुविधांसाठी मंजूर झाले आहेत. पुढच्या काळातसुध्दा बांबवडेच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत. ‘सुंदर गाव, स्वच्छ गाव, निरोगी गाव’ या संकल्पनेतून गावाच्या विकासासाठी कामे सांगा, आम्ही ती तत्परतेने करू.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बांबवडेचा आढावा घेऊन गावातील रुग्ण व लसीकरणाची माहिती त्यांनी घेतली. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती अरुण पवार, पोपट संकपाळ, पांडुरंग संकपाळ, पंचायत समिती सदस्या मंगल भंडारे, सरपंच प्रणिता भंडारे, विश्वास पाटील, शशिकांत पवार, हणमंतराव पवार, पोलीसपाटील फिरोज मुल्ला, उपसरपंच मंगल पवार उपस्थित होते.