ऊस उत्पादन वाढीसाठी ठिबक सिंचन सुविधा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:21 AM2021-01-09T04:21:22+5:302021-01-09T04:21:22+5:30

इस्लामपूर : ज्या शेतकऱ्यांचे उसाचे उत्पादन कमी आहे, त्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी त्यांना ठिबक सिंचनचे साधन उपलब्ध करून देत आहोत. ...

To provide drip irrigation facility to increase sugarcane production | ऊस उत्पादन वाढीसाठी ठिबक सिंचन सुविधा देणार

ऊस उत्पादन वाढीसाठी ठिबक सिंचन सुविधा देणार

Next

इस्लामपूर : ज्या शेतकऱ्यांचे उसाचे उत्पादन कमी आहे, त्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी त्यांना ठिबक सिंचनचे साधन उपलब्ध करून देत आहोत. यावर्षी ५०० एकर, तर पुढील ५-६ वर्षांत कार्यक्षेत्रातील बहुतेक सर्व क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन युवा नेते प्रतीक पाटील यांनी केले. ही योजना जास्तीत-जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यक्षेत्रातील २५ गावांत प्रबोधन सभा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राजारामबापू साखर कारखान्याच्या राजारामबापू पाटील अद्ययावत गट शेती व ठिबक सिंचन योजनेचा प्रारंभ पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ज्ञ डॉ. भरत रासकर, व्हीएसआयचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. पी. शिंदे, आर. बी. भोईटे, राजारामबापू ग्रुप ऑफ कंपनीजचे उपाध्यक्ष सुभाषराव जमदाडे उपस्थित होते.

पी. आर. पाटील म्हणाले, जयंत पाटील यांनी ३०-३२ वर्षांपूर्वी शेतकत्यांच्या शिवारात पाणी आणून आर्थिक क्रांती घडवून आणली. आता प्रतीक पाटील शेतकऱ्यांच्या जमिनीमधील उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही दुसरी क्रांती ठरेल.

सुभाषराव जमदाडे यांनी प्रास्ताविक केले. शेती समितीचे अध्यक्ष श्रेणिक पाटील, इरिगेशन समितीचे अध्यक्ष एल. बी. माळी, संचालक पै. भगवान पाटील, कार्तिक पाटील, प्रदीपकुमार पाटील, बाळासाहेब पवार, जालिंदर कांबळे, सुवर्णा पाटील, मेघा पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, डी. एम. पाटील, गणेश यादव उपस्थित होते. मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील यांनी आभार मानले. विश्वनाथ पाटसुते यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो-०८इस्लामपुर१

फोटो ओळी- राजारामनगर येथे अद्यावत गट शेती व ठिबक सिंचन योजनेच्या प्रारंभप्रसंगी प्रतीक पाटील यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: To provide drip irrigation facility to increase sugarcane production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.