मिरजेतील महापालिकेच्या कोविड रुग्णालयात अधिकाधिक सुविधा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:27 AM2021-04-24T04:27:31+5:302021-04-24T04:27:31+5:30

मिरजेत शासकीय तंत्रनिकेतनमधील महापालिकेच्या कोविड रुग्णालयाची पाहणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, पांडुरंग कोरे, स्वाती ...

Provide maximum facilities at Kovid Hospital of Miraj Municipal Corporation | मिरजेतील महापालिकेच्या कोविड रुग्णालयात अधिकाधिक सुविधा द्या

मिरजेतील महापालिकेच्या कोविड रुग्णालयात अधिकाधिक सुविधा द्या

Next

मिरजेत शासकीय तंत्रनिकेतनमधील महापालिकेच्या कोविड रुग्णालयाची पाहणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, पांडुरंग कोरे, स्वाती शिंदे आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : मिरजेत शासकीय तंत्रनिकेतनमध्ये महापालिकेतर्फे सुरू केल्या जाणाऱ्या कोविड रुग्णालयाची पाहणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली. उपायुक्त राहुल रोकडे यांनी त्यांना कोविड सेंटरमधील सोयी-सुविधांची माहिती दिली.

शनिवार (दि. २४) पासून हे कोविड सेंटर सुरू होत आहे. गाडगीळ यांनी येथे ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह अन्य सोयीसुविधा देण्याच्या सूचना केल्या. कोरोनाबाधितांची हेळसांड होऊ नये यासाठी काळजी घेण्यास सांगितले. महापालिकेने कोरोनाच्या पहिल्या लाटेत सांगली-कोल्हापूर रस्त्यावर आदिसागर कार्यालयात कोविड सेंटर सुरू केले होते. महापालिका क्षेत्रात सध्या १५ सेंटर सुरू आहेत. मिरजेतील कोविड सेंटरमध्येही विनाशुल्क योग्य उपचार व अैाषधे देण्याची सूचना गाडगीळ यांनी केली. दरम्यान, महापालिका क्षेत्रातील ५२ टक्क्यांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण होणार आहे. त्याचीही तयारी करण्यास सांगितले. या वेळी स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, युवा मोर्चाचे अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, नगरसेवक गजानन मगदूम, स्वाती शिंदे, अनारकली कुरणे, सविता मदने, अश्रफ वांकर, बंडू सरगर, रघुनाथ सरगर, श्रीकांत वाघमारे, आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे, वैभव वाघमारे, आप्पा हलकुडे आदी उपस्थित होते.

Web Title: Provide maximum facilities at Kovid Hospital of Miraj Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.