माैजे डिग्रजला ऑक्सिजन मशीन प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:25 AM2021-05-24T04:25:39+5:302021-05-24T04:25:39+5:30

----------- काेराेना राेखण्यासाठी महिलांनी प्रबाेधन करावे मिरज : महिलांनी पुढाकार घेऊन गावात प्रबाेधन केल्यास लवकरात लवकर गावे काेराेना मुक्तीकडे ...

Provide oxygen machines to my degree | माैजे डिग्रजला ऑक्सिजन मशीन प्रदान

माैजे डिग्रजला ऑक्सिजन मशीन प्रदान

Next

-----------

काेराेना राेखण्यासाठी महिलांनी प्रबाेधन करावे

मिरज : महिलांनी पुढाकार घेऊन गावात प्रबाेधन केल्यास लवकरात लवकर गावे काेराेना मुक्तीकडे सरकतील, असे मत तहसीलदार डी. एस. कुंंभार यांनी व्यक्त केले. ते खंडेराजुरी येथील बचत गट आणि सामाजिक कार्यकर्त्या, महिला मंडळांना घेऊन काेराेना राेखण्यासाठी आयाेजित बैठकीत बाेलत हाेते.

-----------

जत पूर्व भागात किराणाचे भाव दुप्पट

माडग्याळ : काेराेनाच्या महामारीमुळे लाॅकडाऊन सुरू झाले. जत पूर्व भागातील किराणा दुकानदारांनी याचा फायदा उठविला आहे. अत्यावश्यक असणाऱ्या तेल, डाळ, शेंगा व साखरेचे दर वाढले आहेत. दरराेजच्या जीवनातील तेलाची फाेडणी गायब झाल्याचे चित्र दिसत आहे.

---------------

नवेखेड येथील स्ट्रीट लाईट सुरू करा

नवेखेड : येथील स्ट्रीट लाईट बंद असल्याने गाव तीन दिवस अंधारात आहे. ही लाईट तत्काळ सुरू करा, अन्यथा तीव्र आंदाेलन करण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे. गावात मागील आठवड्यात झालेल्या पावसाने काही ठिकाणी वीजवाहक तारा तुटल्या हाेत्या,तसेच अन्य काही अडचणी हाेत्या त्या महावितरणने दूर केल्या; परंतु स्ट्रीट लाईट बाबतीतील बिघाड सापडला नाही. ग्रामस्थांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.

Web Title: Provide oxygen machines to my degree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.