बारा बलुतेदारांसाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेज द्या : शरद पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:11 AM2021-05-04T04:11:20+5:302021-05-04T04:11:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : बारा बलुतेदारांसाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेज मिऴावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : बारा बलुतेदारांसाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेज मिऴावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शरद पाटील यांनी नायब तहसीलदार सचिन कोकाटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे, ५ एप्रिल २०२१ पासून राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. पण १२ बलुतेदारांचे छोटे परंपरागत व्यवसाय पूर्णतः बंद आहेत. त्यामुळे आधीच गरीब असलेला हा समाज लॉकडाऊनमुळे अधिकच आर्थिक अडचणीत आलेला आहे. एकप्रकारे या समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे. लॉकडाऊन जाहीर करताना रिक्षाचालक, बांधकाम मजूर, फेरीवाले आदी लोकांकरिता आर्थिक साहाय्य जाहीर केले. परंतु १२ बलुतेदारांसाठी कुठलेही आर्थिक साहाय्य जाहीर केले नाही. तरी राज्यातील १२ बलुतेदारांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून प्रती कुटुंब किमान पाच हजार रुपये आर्थिक साहाय्य करावे.
यावेळी शरद गुरव, गिरजवडेचे उपसरपंच विजय पाटील, प्रमोद क्षीरसागर, बाबूराव पाटील, वैभव पाटील, प्रतीक पाटील उपस्थित होते.