‘चांदोली’तून थेट पाइपलाइनने पाणी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:21 AM2021-01-14T04:21:48+5:302021-01-14T04:21:48+5:30
वारणावती : मणदूर ते कोकरूडपर्यंतच्या वारणा काठच्या गावांना चांदोली धरणातून थेट पाइपलाइनने पिण्याचे पाणी मिळावे यासाठी संघर्षाची तयारी ठेवावी, ...
वारणावती : मणदूर ते कोकरूडपर्यंतच्या वारणा काठच्या गावांना चांदोली धरणातून थेट पाइपलाइनने पिण्याचे पाणी मिळावे यासाठी संघर्षाची तयारी ठेवावी, असे आवाहन शिराळा पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब नायकवडी यांनी केले.
मणदूर (ता. शिराळा) येथे सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मणदूरचे सरपंच वसंत पाटील होते. बाळासाहेब नायकवडी यांची शिराळा पंचायत समितीच्या उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने पैलवान आनंदराव चौगुले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
बाळासाहेब नायकवडी म्हणाले की, शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील मणदूर ते कोकरूडपर्यंतच्या वारणा काठच्या गावांना धरणाच्या पॉवर हाऊसमधून पाणी जाते; त्याच पाइपमधून पिण्याचे पाणी मिळावे. धरणाच्या आराखड्यात अशी व्यवस्था केली आहे.
धरण आमच्या उशाशी आहे. आमच्याच बांधवांनी योगदान दिल्याने वारणा, कृष्णा काठासह दुष्काळी भाग सुजलाम् सुफलाम् झाला; पण आमच्या इथल्या गावांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
मोहन पाटील यांनी स्वागत केले. यावेळी पांडुरंग पाटील, आनंदराव चौगुले, जी. जी. पाटील, रामचंद्र पाटील, प्रचीती दूध संघाचे संचालक बाळासाहेब पाटील, शिवाजी पाटील, जी. के. पाटील, दीपक पाटील आदी उपस्थित होते. रामचंद्र पाटील यांनी आभार मानले.
फोटो- १३वारणावती१
फोटो ओळ -मणदूर (ता. शिराळा) येथील ग्रामस्थांच्या वतीने उपसभापती बाळासाहेब नायकवडी यांचा आनंदराव चौगुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वसंत पाटील, जी. जी. पाटील, आनंदराव चौगुले, मोहन पाटील, पांडुरंग पाटील उपस्थित होते.