तरतूद शून्य, तरीही साडेअकरा कोटींची वाहन खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:27 AM2020-12-31T04:27:40+5:302020-12-31T04:27:40+5:30

यासंदर्भात महापौर गीता सुतार यांना साखळकर यांनी पत्र दिले आहे. साखळकर म्हणाले की, १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून घनकचरा ...

Provision zero, yet vehicle purchase of Rs | तरतूद शून्य, तरीही साडेअकरा कोटींची वाहन खरेदी

तरतूद शून्य, तरीही साडेअकरा कोटींची वाहन खरेदी

Next

यासंदर्भात महापौर गीता सुतार यांना साखळकर यांनी पत्र दिले आहे. साखळकर म्हणाले की, १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून घनकचरा व्यवस्थापनासाठी वाहन खरेदी करण्याचा विषय प्रशासनाने दिला होता. त्याचा खर्च साफसफाई सोयी ई ०२८२ या लेखाशीर्षामधील १५ कोटींच्या निधीतून करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. या लेखाशीर्षात केवळ १० कोटींची तरतूद आहे. त्यापैकी ७ कोटी शिल्लक आहेत. शिवाय हे लेखाशीर्ष १४ व्या वित्त आयोगाचे नाही. मग वित्त आयोगातून खरेदी कशी करणार? २०२०-२१ च्या अंदाजपत्रकात वित्त आयोगाचे लेखाशीर्ष क्रमांक आर ०२२३ मध्ये करण्यात आली. त्यात शून्य तरतूद आहे. प्रशासनाने सभागृहाची दिशाभूल करीत हा विषय मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे वाहन खरेदी करणे बेकायदेशीर ठरणार असून, त्याची गांभीर्याने दखल घ्यावी, असे पत्र महापौरांना दिले.

Web Title: Provision zero, yet vehicle purchase of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.