Sangli: चिथावणीखोर, भावना दुखावणारी वक्तव्ये; इस्लामपुरात नितेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 05:07 PM2024-09-28T17:07:24+5:302024-09-28T17:08:10+5:30
इस्लामपूर : इस्लामपूर शहरात ऑगस्ट महिन्यात सकल हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चावेळी झालेल्या जाहीर सभेत भाजपचे आमदार नितेश राणे ...
इस्लामपूर : इस्लामपूर शहरात ऑगस्ट महिन्यात सकल हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चावेळी झालेल्या जाहीर सभेत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल आणि एका समाजाच्या भावना दुखावणारी वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी तब्बल महिनाभराने आमदार राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत शाकिर ईसालाल तांबोळी (वय ५०, इस्लामपूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आ. नितेश राणे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२(२),३०२,३५१(१ व २),३५२ नुसार हा गुन्हा नोंद केला आहे. २९ ऑगस्ट या दिवशी यल्लमा चौकात हिंदू जन आक्रोश मोर्चाची दुपारी जाहीर सभा झाली होती. त्या सभेत आ. राणे यांनी सामाजिक तेढ निर्माण करण्यासह चिथावणीखोर आणि भावना दुखावणारी वक्तव्ये केली होती. सहायक पोलिस निरीक्षक सागर वरुटे अधिक तपास करीत आहेत.