जनतेचे प्रश्न प्राधान्याने साेडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:19 AM2021-07-21T04:19:20+5:302021-07-21T04:19:20+5:30

ओळ : शिवणी (ता. कडेगाव) येथे आमदार अरुण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांच्या हस्ते कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी ...

Public issues will be given priority | जनतेचे प्रश्न प्राधान्याने साेडविणार

जनतेचे प्रश्न प्राधान्याने साेडविणार

Next

ओळ : शिवणी (ता. कडेगाव) येथे आमदार अरुण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांच्या हस्ते कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

लोकमत न्यूज नेटवर्क

वांगी : न्याय्य बाजूने उभे राहून लोकांची सेवा करा, कसलीही अडचण असली तरी ती आमच्यापर्यंत घेऊन या, प्राधान्याने जनतेचे प्रश्न सोडवू, असे प्रतिपादन आमदार अरुण अण्णा लाड यांनी केले.

शिवणी (ता. कडेगाव) येथील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या वेळी ते बाेलत हाेते. या वेळी जिल्हा बँकेचे संचालक किरण लाड, जिल्हा परिषदेचे गटनेते शरद लाड, माजी सभापती सुशांत देवकर, रमेश एडके प्रमुख उपस्थित होते.

लाड म्हणाले, सरकारच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवा, पक्षाशी एकनिष्ठ राहून समाजकार्य केल्यास पक्ष दखल घेतोच, त्यासाठी कार्यमग्न राहा. जी.डी. बापूंचे विचार पुढे नेऊया, बापूंचे सार्वभौमत्वाचे स्वप्न पूर्ण करूया, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा. समाजकारणातून आपली ओळख तयार करा. भाजप सरकार सामान्यांचे नाही. त्यांना आपल्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही. यासाठीच सर्वसामान्यांचे प्रश्न खासदार शरद पवार वेळोवेळी मांडत आहेत. त्यांच्या हाताला बळ देऊया. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था ताकदीने लढवून ताब्यात घ्या. यासाठी लागेल ती सर्व मदत आम्ही करू.

या वेळी पूजा लाड, जगदीश महाडिक, बाळासाहेब वत्रे, सोमनाथ पवार, संदेश जाधव, नवनाथ काकडे, अजीज मुल्ला यांच्यासह शिवणी गावातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Public issues will be given priority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.