गुणवत्तापूर्ण शाळानिर्मितीसाठी लोकसहभाग गरजेचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:22 AM2021-01-15T04:22:34+5:302021-01-15T04:22:34+5:30
शिराळा : गुणवत्तापूर्ण व सुविधासंपन्न शाळानिर्मिती यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन डाएट सांगलीचे प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी यांनी ...
शिराळा : गुणवत्तापूर्ण व सुविधासंपन्न शाळानिर्मिती यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन डाएट सांगलीचे प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी यांनी केले.
पाडळी (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळा येथे प्राचार्य डॉ. होसकोटी यांनी भेट दिली; यावेळी ते बोलत होते. त्यांनी मॉडेल स्कूल संकल्पनेतील विविध निकष पूर्ण कसे करता येतील, याबाबत मार्गदर्शन केले. गुणवत्तापूर्ण व सुविधासंपन्न शाळा निर्मिती यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. शिक्षकांनी अद्ययावत ज्ञान संपादन करून विद्यार्थ्यांनी सुप्तगुण विकसित करावेत. ग्रंथालये बंदिस्त नकोत, मुक्त हवीत, त्याचा वापर केल्यास वाचन विकास होईल, असे त्यांनी प्रतिपादन केले.
शिक्षण विस्ताराधिकारी विष्णू दळवी, केंद्रप्रमुख सुहास रोकडे, सरपंच सत्यवान पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रकाश बुथे, विठ्ठल पाटील, महादेव देसाई, बाळकृष्ण गवळी, आशाकिरण पाटील, तृप्ती मुळीक, मंगल पाटील, ग्रामसेवक आनंदा पवार, पांडुरंग गायकवाड, आर. आर. सकटे आदी उपस्थित होते.
फोटो-१४शिराळा१
फोटो ओळ : पाडळी (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळा भेटीवेळी प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विष्णू दळवी, सुहास रोकडे, विठ्ठल पाटील, महादेव देसाई, बाळकृष्ण गवळी उपस्थित होते.