लोकसेवा आयोगाने उमेदीची वर्षे वाचविली, मर्यादित सहा-नऊ संधीच्या निर्णयाचे स्वागत?????????????????????
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:27 AM2021-01-03T04:27:08+5:302021-01-03T04:27:08+5:30
सांगली : लोकसेवा आयोगाच्या परीक्षा वारंवार देणे आता शक्य होणार नाही. खुल्या प्रवर्गासाठी सहावेळा तर आरक्षित प्रवर्गातील तरुणांना नऊवेळाच ...
सांगली : लोकसेवा आयोगाच्या परीक्षा वारंवार देणे आता शक्य होणार नाही. खुल्या प्रवर्गासाठी सहावेळा तर आरक्षित प्रवर्गातील तरुणांना नऊवेळाच देता येईल. या निर्णयाचे परीक्षार्थींनी स्वागत केले आहे. तो यापूर्वीच व्हायला हवा होता अशा प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या.
परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी सांगितले की, अनेक तरुण उत्तीर्ण होईपर्यंत दरवेळी परीक्षा देतात. तोपर्यंत वयाची चाळीशी उलटते. त्यानंतरही यश मिळाले नाही तर, पुढे अन्य कोणती नोकरी करण्याची मानसिकता राहत नाही. त्यामुळे ते नैराश्याच्या गर्तेत जातात. नव्या निर्णयामुळे आता विचारपूर्वक परीक्षा देतील.
आयोगाने निर्णय उशिरा घेतल्याचेही तरुणांचे म्हणणे आहे. सध्या भरमसाठ परीक्षार्थींमुळे नाहक स्पर्धा निर्माण होते. पूर्वपरीक्षेला गर्दी करणारे अंतिम परीक्षेला बसतही नाहीत, त्याचा फटका प्रामाणिक अभ्यास करणाऱ्यांना बसतो. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनाही आता पूर्वपरीक्षा देताना विचार करावा लागेल असे परीक्षार्थींनी सांगितले.
अशाप्रकारे होईल संधीची गणना
एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एक पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.
उमेदीची वर्षे वाया जाणार नाहीत
नव्या निर्णयामुळे तरुणांच्या आयुष्यातील उमेदीची वर्षे वाचणार आहेत. एरवी अनेक तरुण वर्षानुवर्षे लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करत राहतात. यश मिळेपर्यंत चाळीशी उलटते. त्यानंतरही अपयशी ठरल्यावर ते निराशेच्या गर्तेत जातात. नव्या निर्णयामुळे तसे होणार नाही.
सागर येलूरकर, बुधगाव
अनावश्यक स्पर्धा कमी होईल
जिल्ह्यात नव्या निर्णयामुळे परीक्षेतील स्पर्धा कमी होईल. यापूर्वी पदवीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थीही परीक्षा द्यायचे. एकावेळी पाच-सहा लाख विद्यार्थी परीक्षा द्यायचे. त्यामुळे स्पर्धा अनावश्यक वाढायची. आता संधी कमी झाल्याने पदवी पूर्ण झालेलेच विद्यार्थी परीक्षे देतील. निर्णय चांगला आहे. - शैलेश नरुटे, ब्रम्हनाळ
कला, वाणिज्यच्या विद्यार्थ्यांना फायदा
अभियांत्रिकीचे विद्यार्थी पूर्वपरीक्षेत यशस्वी व्हायचे, पण अंतिमला अभ्यासाअभावी बसायचे नाहीत. आता मऱ्यादीत संधीमुळे ते परीक्षेला बसण्यापूर्वी विचार करतील. याचा फायदा कला, वाणिज्यच्या विद्यार्थ्यांना होईल. स्पर्धा कमी होऊन विद्यार्थी ताणविरहीत परीक्षा देऊ शकतील.
- स्वप्नील अवताडे, अकलूज
अशाप्रकारे होईल संधीची गणना
एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एक पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.
-----------