पुजारवाडी ग्रामपंचायतीचे दिव्यांग निधीबाबत दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:19 AM2021-02-05T07:19:45+5:302021-02-05T07:19:45+5:30

दिघंची : पुजारवाडी (ता. आटपाडी) ग्रामपंचायतीकडून दिव्यांग लोकांना ५ टक्के निधी देण्यात आलेला नाही. तो निधी तत्काळ देण्यात ...

Pujarwadi Gram Panchayat neglects Divyang Nidhi | पुजारवाडी ग्रामपंचायतीचे दिव्यांग निधीबाबत दुर्लक्ष

पुजारवाडी ग्रामपंचायतीचे दिव्यांग निधीबाबत दुर्लक्ष

googlenewsNext

दिघंची : पुजारवाडी (ता. आटपाडी) ग्रामपंचायतीकडून दिव्यांग लोकांना ५ टक्के निधी देण्यात आलेला नाही. तो निधी तत्काळ देण्यात यावा, अशी मागणी येथील दिव्यांगांमधून हाेत आहे.

गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून दिव्यांग लोक निधीची मागणी ग्रामपंचायतीकडे करत आहेत. परंतु ग्रामपंचायत प्रशासन त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. ग्रामपंचायतकडे निधी शिल्लक असूनही दिव्यांग लोकांना वितरीत करण्यात येत नाही. ग्रामपंचायतीकडे दिव्यांगांनी आपली कागदपत्रे जमा केली आहेत. तरीही त्यांना निधी वितरीत केलेला नाही. त्यामुळे निधी मिळण्यासाठी दिव्यांगांना ग्रामपंचायतीकडे सतत हेलपाटे मारावे लागत आहेत.

२०१६ पासून राज्य सरकारने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातील पाच टक्के निधी दिव्यांगांना वाटपाचा अध्यादेश काढला आहे. मात्र या अध्यादेशाची अंमलबजावणी अद्याप पुजारवाडी ग्रामपंचायतीने केलेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निधी दिव्यांग बांधवांना मिळणे अपेक्षित होते. पण ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष असल्याने नाराजी व्यक्त हाेत आहे.

Web Title: Pujarwadi Gram Panchayat neglects Divyang Nidhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.