दर घसरल्यानंतरही डाळी सामान्यांच्या आवाक्याबाहेर, पावसाने पालेभाज्याही महागाईत भिजल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:17 AM2021-07-23T04:17:45+5:302021-07-23T04:17:45+5:30

अविनाश कोळी लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कडधान्यावरील साठवणूक मर्यादा केंद्र सरकारने वाढविल्यामुळे सध्या होलसेल बाजारात डाळींच्या दरात घसरण ...

Pulses out of reach of common man | दर घसरल्यानंतरही डाळी सामान्यांच्या आवाक्याबाहेर, पावसाने पालेभाज्याही महागाईत भिजल्या

दर घसरल्यानंतरही डाळी सामान्यांच्या आवाक्याबाहेर, पावसाने पालेभाज्याही महागाईत भिजल्या

Next

अविनाश कोळी

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कडधान्यावरील साठवणूक मर्यादा केंद्र सरकारने वाढविल्यामुळे सध्या होलसेल बाजारात डाळींच्या दरात घसरण झाली आहे. तरीही या डाळी अद्याप सामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत. दुसरीकडे, पावसाचा जोर वाढल्याने आवक घटून भाजीपालाही महागाईत भिजला आहे.

एकीकडे कोरोनाने सर्व घटकांना आर्थिक संकटात टाकले असताना महागाईने दुसऱ्या बाजूने छळण्यास सुरुवात केली आहे. गृहिणींचे स्वयंपाकघरातील बजेट वारंवार ढासळत आहे. काटकसर किती आणि कुठे करायची, असा प्रश्न आता गृहिणींना सतावत आहे.

चौकट

डाळींचे होलसेल दर (प्रतिकिलो)

हरभरा ६०

तूर ८२

मूग ८५

मसूर ८०

चौकट

भाजीपाला किरकोळ विक्री भाव (प्रतिकिलो)

बटाटा २५

कांदा ३०

टोमॅटो ३०

काकडी ८०

कोथिंबीर पेंढी २०

पालक १५

मेथी २०

दोडका ४०

गवारी ८०

लिंबू शेकडा १५०

चौकट

म्हणून डाळ महागली

सध्या कोरोना काळात पौष्टिक आहाराकडे लोकांचा कल वाढल्याने डाळींना मागणी वाढली आहे.

मागणी वाढत असताना पुरवठा कमी होत असल्याने डाळी महागल्या आहेत.

केंद्र सरकारने कडधान्यांच्या साठवणुकीवर निर्बंध आणल्यानेही काही दिवसांपूर्वी डाळींच्या दरात वाढ झाली होती.

चौकट

म्हणून भाजीपाला कडाडला

सध्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. मागणी कायम असताना आवक घटल्यामुळे दरांत मोठी वाढ झाली आहे, अशी माहिती जनसेवा भाजीविक्रेता संघटनेचे उपाध्यक्ष कैस अलगूर यांनी दिली.

कोट

गेल्या काही वर्षांपासून डाळी महागच आहेत. शंभर रुपयांच्या घरात त्या सतत दिसतात. दुसरीकडे, पालेभाज्याही महागल्याने चिंता वाढली आहे.

- कमल सूर्यवंशी, गृहिणी

कोट

स्वयंपाकघरातील प्रत्येक वस्तू आता महाग होत आहे. कडधान्ये तर आवाक्याबाहेर आहेत; पण भाजीपालाही आता महाग होत आहे. त्यामुळे काटकसर करावी लागत आहे.

- सारिका पाटील, गृहिणी

Web Title: Pulses out of reach of common man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.