महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे 13 हजार 515 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 02:24 PM2021-08-05T14:24:39+5:302021-08-05T14:26:08+5:30
Flood Sangli : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे सांगली जिल्ह्यात शेतीचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून जिल्हयात महापूरामुळे बाधित झालेल्या 5 तालुक्यांतील 176 गावांमधील आतापर्यंत 39 हजार 509 शेतकऱ्यांच्या 13 हजार 515 हेक्टर जमीनींचे पंचनामे पुर्ण झाली आहेत. उर्वरित शेतीचे पंचनामे युध्दपातळीवर पुर्ण करण्यासाठी यंत्रणा गतीने कार्यरत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले आहे.
सांगली : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे सांगली जिल्ह्यात शेतीचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून जिल्हयात महापूरामुळे बाधित झालेल्या 5 तालुक्यांतील 176 गावांमधील आतापर्यंत 39 हजार 509 शेतकऱ्यांच्या 13 हजार 515 हेक्टर जमीनींचे पंचनामे पुर्ण झाली आहेत. उर्वरित शेतीचे पंचनामे युध्दपातळीवर पुर्ण करण्यासाठी यंत्रणा गतीने कार्यरत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यात महापुरामुळे तसेच अतिवृष्टीमुळे, ओढ्यांना जादा पाणी आल्याने मिरज, वाळवा, पलूस, तासगाव व शिराळा या पाच तालुक्यातील 247 गावे बाधित झाले आहेत. शासन निर्देशानुसार बाधित गावातील नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्यात येत आहेत.
यामध्ये मिरज तालुक्यातील 26 गावे बाधित झाली असून त्यापैकी 21 गावांतील 9 हजार 561 शेतकऱ्याचे 4 हजार 227 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाली आहेत. वाळवा तालुक्यातील 98 गावे बाधित झाली असून त्यापैकी 43 गावांतील 11 हजार 119 शेतकऱ्याचे 4 हजार 42 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाली आहेत. शिराळा तालुक्यातील 95 गावे बाधित झाली असून त्यापैकी 87 गावांतील 13 हजार 39 शेतकऱ्याचे 2 हजार 459 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाली आहेत.
पलूस तालुक्यातील 26 गावे बाधित झाली असून त्यापैकी 23 गावांतील 5 हजार 727 शेतकऱ्याचे 2 हजार 757 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाली आहेत. तासगाव तालुक्यातील 2 गावे बाधित झाली असून तेथील 63 शेतकऱ्याचे 27 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाली आहेत.
शासन निर्देशानूसार बाधित गावांतील कुटुंबे, कृषी, पशुधन व व्यवसायीक नुकसानीचे युध्द पातळीवर करण्यात येत आहेत. आज अखेर 22 हजार 185 कुटुंबांचे पंचनामे करण्यात आले आहेत.
पंचनाम्यानूसार पुर्णत: नष्ट झालेली कच्ची घरे 374 व पक्की घरे 106, अंशत: नष्ट झालेली कच्ची घरे 1 हजार 280 व पक्की घरे 492, तसेच 36 झोपड्या, 839 गोठ्यांचे पंचनामे पुर्ण झाली आहेत. त्याचबरोबर आजआखेर 27 कारागिरांचे सहयंत्राचे, 39 कारांगिरांचे कच्चा व तयार मालाचे, 2 हजार 983 छोटे उद्योग, छोटी दुकाने, टपरीधारक, हातगाडीधारक इत्यादींच्या पंचनाम्यानूसार नुकसान दिसून आले आहे, अशी माहितीही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.