पुणे-मिरज दुहेरीकरण रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 02:29 PM2019-11-25T14:29:49+5:302019-11-25T14:30:30+5:30
मात्र कामास प्रत्यक्ष सुरूवात झाल्यानंतर गेल्या वर्षभरात ताकारी-शेणोली व फुरसुंगी-पुणे दक्षिण मध्य रेल्वेतर्फे लोंढा ते मिरज या १९० किलोमीटर लांबीच्या दुहेरीकरणाचे काम वेगात सुरू असून या मार्गावर नवीन पुलांच्या उभारणीसह दुहेरीकरणासाठी मातीच्या भरावाचे काम पूर्ण झाल्याने, लोंढा-मिरज या मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण वर्षभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मिरज : मध्य रेल्वेच्या मिरज-पुणे रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम रखडल्याने हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. यावर्षी पावसामुळे बंद झालेले दुहेरीकरणाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या लोंढा-मिरज दुहेरीकरणाचे काम मात्र गतीने सुरू आहे.
कोल्हापूर-मिरज-पुणे मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असल्याने या मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाची अनेक वर्षांची मागणी आहे. पुणे ते मिरजदरम्यान सातारा, शेणोली व कºहाड येथून एक वर्षापूर्वी दुहेरीकरणाच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे. दुहेरीकरणाचे काम मात्र संथगतीने सुरू असल्याने, आणखी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. मिरज-पुणे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी चालूवर्षी १५० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र काम अतिशय संथगतीने सुरू असून ताकारी - शेणोलीदरम्यान १६ कि.मी. दुहेरी रेल्वेमार्गाची चाचणी रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांकडून पार पडल्यानंतर नवीन मार्गावरुन आता मालवाहतूक सुरू आहे. मिरज - पुणे या २८० कि.मी. रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणापैकी ताकारी ते शेणोलीसह पुणे-फुरसुंगी या केवळ ३५ किलोमीटर मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे.
संथगतीने काम सुरू असल्याने दुहेरीकरणास आणखी काही वर्षे विलंब होण्याची शक्यता आहे. ताकारी ते भिलवडी या २० किलोमीटर रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण करून या वर्षाखेर चाचणीचे उद्दिष्ट आहे. गेली चार वर्षे लोंढा-मिरज-पुणे या ४६७ किलोमीटर मार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. पुणे ते मिरजदरम्यान २८० कि.मी. दुहेरीकरणाचे काम तीन वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र कामास प्रत्यक्ष सुरूवात झाल्यानंतर गेल्या वर्षभरात ताकारी-शेणोली व फुरसुंगी-पुणे दक्षिण मध्य रेल्वेतर्फे लोंढा ते मिरज या १९० किलोमीटर लांबीच्या दुहेरीकरणाचे काम वेगात सुरू असून या मार्गावर नवीन पुलांच्या उभारणीसह दुहेरीकरणासाठी मातीच्या भरावाचे काम पूर्ण झाल्याने, लोंढा-मिरज या मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण वर्षभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे.