पुण्याचा संग्राम चौगुले ‘तरूण भारत श्री’
By Admin | Published: January 8, 2015 11:22 PM2015-01-08T23:22:16+5:302015-01-09T00:13:52+5:30
मिस फ्रान्सिस्काच्या हिट पोझेस
सांगली : महाराष्ट्राचा अव्वल शरीरसौष्ठवपटू संग्राम चौगुले याने शोल्डर व बायसेफ मसल्सच्या जोरावर मानाचा ‘तरुण भारत श्री २०१५’ हा किताब पटकावला. आठ वर्षांच्या खंडानंतर या स्पर्धा झाल्याने तरुण भारत स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. स्पेशल लाईट इफेक्टने या स्पर्धेला सुरेख साज चढविला.जगदीश लाड, महेंद्र चव्हाण व सच्चिंद्र सिंग यांचे आव्हान मोडून काढत संग्रामने विजेतेपद पटकावले. उद्घाटन उत्पादन शुल्क अधिकारी के. शुभेंद्र व मनपा उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी तरुण भारत मंडळाचे अध्यक्ष शिवाजी सगरे होते. सचिव महेश पाटील यांनी स्वागत केले. पारितोषिक वितरण जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह व संजय भोकरे यांच्याहस्ते झाले. पंच म्हणून इनायत तेरदाळकर, गौतम खाडिलकर व राजीव जोशी यांनी काम पाहिले. यावेळी गोपीचंद पडळकर, ज्ञानेश कांबळे, बच्चू हलवाई, प्रमोद जगताप, संतोष पाटील, लहू भडेकर, राजेंद्रसिंह वालिया, प्रमोद सूर्यवंशी, उपस्थित होते. स्पर्धेचा अनुक्रमे एक ते पाच क्रमांकाचा अंतिम निकाल असा : ५५ किलो : सुनील सकपाळ, किशोर कदम, योगेश दिमटे, नितीन शिंगवण, शिरीष कणसे. ६० किलो : रामा मायनाक, नितीन म्हात्रे, अरुण पाटील, कुलदीप डेंगे, उमेश पांचाळ. ६५ किलो : स्वप्निल नरवाडकर, विलास घडवले, तौसिफ मोमीन, जगेश दैत, आशिष माने. ७० किलो : चंद्रशेखर पवार, श्रीनिवास वास्के, श्रीनिवास खारवी, फैयाज शेख, किशोर क्षीरसागर. ७५ किलो : संदीप कडू, शोएब पिरजादे, वाहीद मुलाणी, सौरव साळुंखे, रवींद्र जगदाळे. ८० किलो : सच्चिंद्र सिंग, अभिषेक खेडेकर, गौतम शिर्के, शहाजी चौगुले, वैभव वनगडे. ८५ किलो : जगदीश लाड, सुनील जाधव, अनिकेत गवळी, मुजफ्फर शेख, रस्लन नायकवडी. ८५ किलोवरील : संग्राम चौगुले, महेंद्र चव्हाण, देवधर भोईर, नीलेश दांगडे, सागर शिंदे. बेस्ट पोझर : चंद्रशेखर पवार. (प्रतिनिधी)
संग्राम चौगुले यास सांगलीत ‘तरुण भारत श्री’ किताब संजय भोकरे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी महेश पाटील, इनायत तेरदाळकर, गौतम खाडिलकर, गोपीचंद पडळकर, शिवाजी सगरे उपस्थित होते.
मिस फ्रान्सिस्काच्या हिट पोझेस
जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच महिला शरीरसौष्ठवपटूने स्पर्धेत प्रात्यक्षिके सादर केली. फ्रान्सिस्का ही मलेशियाची खेळाडू असून ती वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तिने या स्पर्धेत टॉप टू बॉटम सुंदर पोझेस देत सांगलीकरांची मने जिंकली. तिची प्रात्यक्षिके बघण्यासाठी एकच गर्दी झाली होती.