अंनिसच्या राज्यस्तरीय रिल्स स्पर्धेत पुण्याच्या शर्वरी लहादे विजेत्या, स्पर्धेत सादर झाल्या ५७ रिल्स

By संतोष भिसे | Published: November 25, 2022 01:54 PM2022-11-25T13:54:16+5:302022-11-25T13:54:46+5:30

सांगली : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जन्मदिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राज्यस्तरीय रिल्स स्पर्धा आयोजित केली होती. पुण्यातील शर्वरी लहादे ...

Pune Sharwari Lahadeh winner of Annis Reels competition | अंनिसच्या राज्यस्तरीय रिल्स स्पर्धेत पुण्याच्या शर्वरी लहादे विजेत्या, स्पर्धेत सादर झाल्या ५७ रिल्स

अंनिसच्या राज्यस्तरीय रिल्स स्पर्धेत पुण्याच्या शर्वरी लहादे विजेत्या, स्पर्धेत सादर झाल्या ५७ रिल्स

googlenewsNext

सांगली : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जन्मदिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राज्यस्तरीय रिल्स स्पर्धा आयोजित केली होती. पुण्यातील शर्वरी लहादे यांच्या रिल्सने प्रथम क्रमांक पटकाविला. अभिनेते डॉ. शरद भुताडिया, अंनिसचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर यांच्या उपस्थितीत  'रिल्स फॉर रॅशनॅलिटी' या ऑनलाइन कार्यक्रमात निकाल घोषित करण्यात आला. स्पर्धेत महाराष्ट्रभरातून ५७ रिल्स सादर झाल्या.

निकाल असा : द्वितीय - गौरव संभूस, डोंबिवली, तृतीय - सुनील शिंदे, सासवड. उत्तेजनार्थ - शिवानी तरे, वसई व सूरज भोसले, थेरगाव, पुणे. यावेळी डॉ. भुताडीया म्हणाले, यानिमित्ताने तरुण वर्ग अंनिसच्या कामात सहभागी होतोय ही आनंददायी बाब आहे. डॉ. दाभोलकर म्हणाले, सोशल मीडियाचा वापर समाजप्रबोधनासाठी करण्याच्या संकल्पनेतून स्पर्धेची संकल्पना साकारली.

वाघेश साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. अजय मोकाशी यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन अक्षिता पाटील व आभार राहुल माने यांनी मानले. परीक्षक म्हणून ऋषी पवार, समीर तांबोळी, पंकज पाटील, अजय मोकाशी, अमोल पाटील, राहुल थोरात यांनी काम केले.

Web Title: Pune Sharwari Lahadeh winner of Annis Reels competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली