जांभूळ शेती फायदेशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:28 AM2021-05-20T04:28:12+5:302021-05-20T04:28:12+5:30
दिशादर्शक फलक बेपत्ता सांगली : शहरातील अनेक मार्गांवरील दिशादर्शक फलकच गायब झाले आहेत. अन्य जिल्ह्यांतील नागरिकांना रस्त्यातून मार्ग काढताना ...
दिशादर्शक फलक बेपत्ता
सांगली : शहरातील अनेक मार्गांवरील दिशादर्शक फलकच गायब झाले आहेत. अन्य जिल्ह्यांतील नागरिकांना रस्त्यातून मार्ग काढताना मोठी पंचाईत होत आहे. दिशादर्शक फलक असतील तर नागरिकांना प्रवास करणे सोयीचे ठरते. म्हणून, महापालिका प्रशासनाने चौकातील दिशादर्शक फलक त्वरित लावावेत, अशी मागणी नागरिकांची आहे.
डासप्रतिबंधक औषध फवारणी करा
सांगली : शहराच्या उपनगरांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या भागात तत्काळ डासप्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यंदा फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
रुग्णवाहिका वाढवा
सांगली : गावपातळीवरील रुग्णांना अतिमहत्त्वाच्या उपचारासाठी खासगी वाहनाने रुग्णालयात जावे लागते. अनेकदा वाहनेही वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णांना अनेकदा आपल्या प्राणाला मुकावे लागते. रुग्णवाहिकांची संख्या वाढविण्याची मागणी आहे.
प्रवासी निवारा बांधा
जोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील कुलकुलीच्या पुढे नवरगाव फाट्यावर बसथांब्यावर प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करावे, अशी मागणी नवरगाव, रामटोला येथील नागरिकांनी केली आहे. नवरगाव फाट्यावर प्रवासी निवारा नसल्याने लाेकांना त्रास सहन करावा लागताे.
रस्त्यावरील अतिक्रमणे हटवा
सांगली : शहरातील कापडपेठ, हरभट रोडवर अनेक व्यापाऱ्यांनी रस्त्यावर अतिक्रमणे करून स्टॉल उभे केले आहेत. काही ठिकाणी लोखंडी पट्ट्या टाकल्यामुळे प्रवाशांना त्याचा अडथळा होताे. प्रवाशांनी मागणी करूनही व्यापाऱ्यांचे अतिक्रमण व्यापाऱ्यांनी काढले नाही.
सीमावर्ती भागात गुटखाविक्री सुरूच
सांगली : जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात गुटखाविक्री सुरूच असल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्याला लागून असलेल्या अथणी, विजापूर येथून अवैध गुटखा विक्रीस आणला जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याची मागणी
सांगली : महापालिका क्षेत्रातील एकत्रित करण्यात येत असलेला कचरा समडोळी रस्त्यालगतच्या कचरा डेपो येथे टाकला जात आहे. शहरातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन महापालिका प्रशासनाने करण्याची गरज आहे. सध्या समडोळी रस्त्यावरील कचरा डेपोचा त्या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.
सांगलीत पार्किंगच्या व्यवस्थेचा अभाव
सांगली : शहरातील मुख्य चौकात पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिक रस्त्यावरच वाहने ठेवतात. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत असून, अपघाताची शक्यताही वाढली आहे. प्रशासनाने या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी आहे.
खुल्या जागेतील पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला
सांगली : महापालिका क्षेत्रात अनेक खुले भूखंड आहेत. काही लोकांनी जागा खरेदी करूनही तेथील कचरा, झुडपे काढली नाहीत. यामुळे या मोकळ्या जागेत पावसाचे पाणी साचून राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ नाहीच
सांगली : कृषी, महसूल व वनविभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र, जिल्ह्यातील संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी दुर्गम भागातील गावांमध्ये पोहोचत नसल्याने या भागातील अनेक शेतकऱ्यांना योजनांची माहिती मिळतच नाही.
ग्रामीण भागात वीजचोरीचे प्रमाण वाढले
सांगली : महावितरणचे बहुतांश कर्मचारी घरूनच कारभार हाकत असल्याने दुर्गम व ग्रामीण भागात विजेची चोरी होत आहे. याचा फटका महावितरणला बसत आहे. त्यामुळे महावितरणने लक्ष देण्याची मागणी सुज्ञ ग्राहकांकडून होत आहे. तासगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात वीजचोरीचे प्रमाण सर्वाधिक आहे.
कोबी पिकाचे नुकसान
सांगली : तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर शेतीमध्ये कोबी या भाजीपाला पिकाची लागवड केली होती. पीक चांगले बहरले होते. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. ऐन पीकविक्री करण्याच्या काळात भाजी बाजारपेठा बंद असल्यामुळे कोबी पिकाचे नुकसान होत आहे.
पानमळ्यांना विम्याचे कवच देण्याची मागणी
सांगली : लॉकडाऊनमुळे पानमळा व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. मिरज पूर्व भागामध्ये अनेक पानमळे आहेत. शासनाने पानमळ्यांना विम्याचे कवच द्यावे, अशी मागणी नरवाड येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
नियम पाळण्याची गरज
सांगली : लॉकडाऊनच्या नियमांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क वापरणे, साबणाने हात धुणे गरजेचे आहे. परंतु, काही नागरिक विनाकारण रस्त्यावर गर्दी करीत आहेत. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे.
घरपोच खतसुविधा देण्याची मागणी
सांगली : लॉकडाऊन कालावधीत शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी कृषी विभागाने बचत गटांमार्फत शेतकऱ्यांना घरपोच खत पोहोचविण्याची सुविधा सुरू करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांकडून तशी मागणी होत असून याकडे कृषी विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
पीक कर्जवाटप संथगतीने
सांगली : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. परंतु, पीक कर्जवाटपाची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. परिणामी, जिल्ह्यात पीक कर्जवाटपाची गती वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
म्युकरमायकोसिसची भीती
सांगली : कोरोनाबरोबरच आता म्युकरमायकोसिसचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, ज्या गावात रुग्ण नाहीत, अशा ठिकाणचेही रुग्ण सापडल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केले जात असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण होत आहे. असे मेसेज पाठविणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
लपूनछपून अनेक व्यवसाय सुरूच
सांगली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केले आहे. अनेक कडक नियम लागू केले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवांना मुभा दिली आहे. असे असले तरीही शहरातील अनेक भागांत अनेक व्यावसायिक आपली दुकाने बंद करून चोरमार्गाने व्यवसाय सुरूच ठेवत आहेत. पोलिसांनी अशा अनेकांवर कारवाई केली. तरीही, पुन्हा चोरून लपून व्यवसाय सुरूच आहेत.